दिल्ली, 24 जून : वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) घरात प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक दिशा आणि नियम असतो. वास्तुशास्त्राचा विचार न करता घर बांधलं किंवा घरात काही वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्या तर, नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) निर्माण व्हायला लागते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आणि यशामध्ये अनेक अडचणी यायला लागतात.
वास्तुशास्त्र सांगितलेल्साय गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर लग्न जमण्यात देखील अडचणी येऊ शकतात. त्यामुळेच वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आपण घरातली म्हणजेच आपल्या आयुष्यातली निगेटिव्हिटी देखील दूर करू शकतो. वास्तुशास्त्राचे नियम पाळले तर घरातली अशांती दूर होऊन सुख-समृद्धी वाढते. घरातल्या नकारात्मक उर्जेने काही चांगल्या कामातही अडचणी येतात. काही लोकांना वास्तुदोषामुळे लग्नातही अडचणी यायला सुरुवात होतात. लग्नात अडचणी येत असतील तर वास्तुदोष यासाठी काही उपाय (Vastu Remedies) करता येऊ शकतात.
(पालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी)
1.घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी (Positive Energy) वाढवण्यासाठी फुलांची मदत घेऊ शकता. मात्र बेडरूममध्ये कधीच झाडं, रोपं किंवा फुलांचे गुच्छ ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार फूलं, रोपं हे लाकडाचं प्रतीक आहेत. ज्यामुळे लग्नामध्ये अडचणी निर्माण होतात.
2.विवाहयोग्य मुलींनी आपल्या खोलीमध्ये फुलांची पेंटिंग लावावी. फुलं सौंदर्य, प्रेम आणि रोमान्सचं प्रतीक आहेत. घराच्या हॉलमध्ये देखील फुलांची पेंटिंग लावल्यामुळे मुलींसाठी चांगली स्थळ यायला सुरुवात होते.
3.वास्तुशास्त्रानुसार चांगला जोडीदार मिळण्यासाठी श्रद्धेने शंकराची पूजा अर्चना करावी. शक्य झाल्यास सोळा सोमवारांचं व्रतही करावं.
(डायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल)
4.घरामधली पश्चिम आणि वायव्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवा. या दिशेने पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. पॉझिटिव्ह एनर्जी वाढली तर, चांगली स्थळंही यायला लागतात.
5.कुमारीका मुलींनी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केली तर, उत्तम जोडीदार मिळतो.
6.ज्या खोलीला एकापेक्षा जास्त दरवाजे आहेत अशाच खोलीमध्ये विवाहयोग्य मुलीने झोपावं. ज्या खोलीमध्ये हवा आणि उजेड कमी असतो अशा खोलीत झोपल्यामुळे लग्न जमण्यात अडचणी येतात.
(‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळलात; मुलांबरोबर क्वालिटी टाइम कसा घालवाल?)
7.लग्नात अडचणी येत असतील तर, काळा रंग वापरणं बंद करा. काळा रंग निराशेचं प्रतीक आहे. राहू-केतू आणि शनिचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे लग्नात अडचणी येता.
8.वास्तुशास्त्रानुसार विवाहयोग्य मुलींच्या खोलीमध्ये मोठी भांडी ठेवू नयेत. शिवाय पलंगाखाली किंवा बेडखाली देखील लोखंडाची भांडी ठेवू नयेत. यामुळे विवाहात अडचणी येतात.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home-decor, Lifestyle