मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /‘या’ व्यक्तींनी चमचाभर दहीसुद्धा खाऊ नये; वाढतील आरोग्याच्या समस्या

‘या’ व्यक्तींनी चमचाभर दहीसुद्धा खाऊ नये; वाढतील आरोग्याच्या समस्या

 दही आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. मात्र सकाळच्या वेळी दही खाण्य़ाने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. सकाळी केळं खाल्याने पोटात अ‍ॅसिड वाढू शकतं. याशिवाय दह्यात पित्त वाढवणारे घटक असतात. सकाळी खाल्ल्यास कफ वाढून खोकला होऊ शकतो.

दही आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. मात्र सकाळच्या वेळी दही खाण्य़ाने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. सकाळी केळं खाल्याने पोटात अ‍ॅसिड वाढू शकतं. याशिवाय दह्यात पित्त वाढवणारे घटक असतात. सकाळी खाल्ल्यास कफ वाढून खोकला होऊ शकतो.

नियमित दही खाण्याने कोलस्ट्रॉल, हाय बीपी सारखे त्रास कमी होतात. पण काही व्यक्तींसाठी दही हानिकारक असतं.

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट :  दही (Yogurt) सर्वांनाच खायला आवडतं. दह्याचे विविध प्रकार तर, सगळ्यांनाच आवडतात. दही अनेक रेसिपी (Recipe) मध्येही वापरलं जातं. आयुर्वेदातही दह्याचं सेवन आरोग्यासाठी चांगलं असल्याचं सांगितलं आहे. दह्यात व्हिटॅमीन (Vitamin), प्रोटीन (Protein) आणि कॅल्शियमही (Calcium) असतं. दह्याने पोटाच्या समस्या दुर होतात आणि पचनशक्ती सुधारते.

दही खाल्ल्याने शरीर निरोगी (Healthy Body) राहतं. दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Health Benefits of Curd) आहे. दह्यामध्ये कॅल्शियम (Calcium) असल्याने हाडांसाठी फायदेशीर आहे. दही नियमित खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल, हाय बीपीचा त्रास कमी होते. पण काही लोकांसाठी दही खाणं हानिकारक ठरू शकतं त्यामुळे अशा लोकांनी दही खाणं टाळावं. या लोकांनी दही दररोज आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं तर, त्रासही सहन करावा लागू शकतो. जाणून घ्या कोणी दही खाऊ नये.

(खोकला झाल्यास हे 8 पदार्थ चुकूनही खाऊ नका; वाढेल Bacterial Infection)

संधिवाताचा त्रास

दही हाडं आणि दातांसाठी चांगलं असलं तरी दही खाण्याने संधिवाताच्या रुग्णांसाठी अडचणी वाढू शकतात.  संधिवाच्या रुग्णांनी नियमितपणे दही खाणं टाळावं. यामुळे साधेदुखीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

(जेवणासाठी रोज वापरता पण, ‘या’ पद्धतीने उपयोगात आणली आहे का मोहरी ?)

दम्याचे रुग्ण

श्वसना संबंधी विकार असतील किंवा दम्याच्या रुग्णांनी दही खाणं टाळावं. दही खायला आवडत असेल तर, दिवास खाणं. दमा किंवा अ‍ॅलर्जिचा त्रास असणाऱ्यांनी दिवसा प्रमाणात दही खावं.

('या' आहेत फ्रीज साफ करण्याच्या सोप्या Tips; दुर्गंध जाऊन चांगली चमक येईल)

लॅक्टोज इनटॉलर्न्स

ज्यांना लॅक्टोज इनटॉलर्न्सचा प्रॉब्लेम आहे, त्यांनीही दही खाऊ नये. अशा लोकांना दही खाल्ल्याने अतिसार आणि पोटात दुखण्याची समस्या असू शकते.

(दररोज चहात ‘हा’ पदार्थ घालता तरी माहिती नाहीत फायदे? मग नक्की वाचा…)

अ‍ॅसिडिटीचा त्रास

ज्या लोकांना खूप अॅसिडिटीची होते त्यांनी दही अजिबात खाऊ नये. रात्री तर दही अजिबात खाऊ नका.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle