Home /News /lifestyle /

खोकला झाल्यास हे 8 पदार्थ चुकूनही खाऊ नका; वाढेल Bacterial Infection

खोकला झाल्यास हे 8 पदार्थ चुकूनही खाऊ नका; वाढेल Bacterial Infection

आपली प्रतिकारशक्ती (Immunity) कमी पडली तर, ताप, सर्दी, खोकला असे आजारही बळावतात. तर, मलेरिया आणि डेंग्यू सारख्या तापाच्या साथीही पावसाळ्यात पसरतात.

    नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : पावसाळ्यात (Monsoon season) सगळीकडे रोगांची साथ पसरते. पावसामुळे बदलेलं वातावरण  (Atmosphere Change) याला कारणीभूत असतं. वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यास आपल्या शरीराला वेळ लागतो. आपली प्रतिकारशक्ती (Immunity) कमी पडली तर, ताप, सर्दी, खोकला असे आजारही बळावतात. तर, मलेरिया आणि डेंग्यू सारख्या तापाच्या साथीही पसरतात. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे आजारपण वाढायला लागतं. या काळामध्ये इम्युनिटी कमजोर झालेली असते. शिवाय जीवजंतू वाढत असतात. त्यामुळे लवकरच आजारपण येतं. त्यामुळे आहाराकडे लक्ष द्यायला हवं. कोरोना (Corona) काळात तर पावसाळ्यामध्ये ताप, सर्दी, खोकला (Cough) सारख्या त्रासांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे या काळामध्ये आहार (Diet In Corona Period) घेताना जागृक असावं लागतं. पावसाळ्यात खोकला झाल्यानंतर काही पदार्थ खाणं टाळायला हवं. कारण या पदार्थांमुळे खोकला जास्त वाढतो. आपल्या रोजच्या आहारातले पदार्थसुद्धा खोकल लवकर बरा करण्यात अडथळा ठरतात. (वजन, कोलेस्ट्रॉल, शुगर कंट्रोलसाठी फायदेशीर ‘ही’ भाजी; मिठाई म्हणूनही खाऊ शकता) दूध तज्ज्ञांच्या मते खोकला झाल्यानंतर दूध पिऊ नये. दूध प्यायल्यामुळे छातीमध्ये कफ जास्त साठतो आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे खोकला झालेला असताना डेअरी प्रॉडक्ट घेणं टाळावं. तांदूळ तांदूळ थंड प्रकृतीचे असतात. त्यामध्ये कफवर्धक गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकला झाला असेल तर, आणखीन वाढतो. भात खाल्ल्यानंतर गळ्यामध्ये इन्फेक्शन वाढू शकतं. भाताबरोबर दही, मसालेदार पदार्थ, केळं खाऊ नये. (रात्री उशिरा जेवायची सवय करा बंद; Pancreas वर परिणाम झाला तर लागेल वाट) साखर खोकला झाला असेल तर साखर खाणं देखील टाळावं. साखर छातीमध्ये इफ्लामेशन वाढवतं. यामुळे आपली इम्युन सिस्टीम कमजोर होते आणि सर्दी खोकला बरा होत नाही. कॉफी खोकला झाल्यास चहा आणि कॉफी दोन्ही टाळायला हवं. कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असतं. कॅफिनमुळे स्नायू डिहायड्रेट होतात. मद्यपान मद्यपान केल्यामुळे छातीमध्ये इफ्लामेशन वाढण्याने जास्त त्रास होतो. याशिवाय व्हाईट ब्लड सेल्स कमी होण्याची भीती देखील असते. व्हाईट ब्लड सेल्स कमी झाल्या तर, शरीरात थकवा जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागतो. (उपवासासाठी शेंगदाणे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाचं! दाण्यांमुळे वाढतो Cancer चा धोका) काय करावं. खोकला झाला असेल तर, साय नसलेलं दूध हळदीसोबत घ्यावं. हळद सर्दी, ताप, खोकला या आजारात प्रभावी ठरते. एक ग्लास दुधात थोडीशी हळद घालून प्यावं आल्याचा काढा करूनही पिऊ शकतात. त्यासाठी आलं, थोडं मिरी आणि मध वापरावं. गरम पाणी पित रहावं, त्यामुळे कफ पातळ होतो आणि छातीला आराम मिळतो. गरम पाण्यात पुदिन्याची पानं आणि ओवा घालून वाफ घ्यावी. याशिवाय पुदिना, ओवा, कापूर, निलगिरी मिक्स करून तयार केलेला आयुर्वेदिक लेप गळ्यावर लावावा. गरम पाण्याने गुळण्या करण्याने घशाला शेक मिळतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Home remedies

    पुढील बातम्या