मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /चहात ‘हा’ पदार्थ तुम्हीही घालत असाल; तरी माहिती नसतील हे फायदे

चहात ‘हा’ पदार्थ तुम्हीही घालत असाल; तरी माहिती नसतील हे फायदे

आले घालून चहा

हिवाळ्यात आल्याच्या चहाचे वेगळेपण आहे. चवदार असण्यासोबतच अद्रकामध्ये असे काही घटक आढळतात जे आपल्या शरीरातील रक्ताचा वेग वाढवतात. ते आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण देखील कमी करतात. त्यामुळे हिवाळ्यात आल्याचा चहा घेतल्याने इतर सर्व फायद्यांव्यतिरिक्त वजन नियंत्रणात राहण्यासही खूप मदत होते.

आले घालून चहा हिवाळ्यात आल्याच्या चहाचे वेगळेपण आहे. चवदार असण्यासोबतच अद्रकामध्ये असे काही घटक आढळतात जे आपल्या शरीरातील रक्ताचा वेग वाढवतात. ते आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण देखील कमी करतात. त्यामुळे हिवाळ्यात आल्याचा चहा घेतल्याने इतर सर्व फायद्यांव्यतिरिक्त वजन नियंत्रणात राहण्यासही खूप मदत होते.

एक कप चहासुद्धा आपली इम्युनिटी (Cup Of Tea For Immunity) वाढवू शकतो. त्यासाठी चहा तयार करताना त्यात एक बदल करावा...

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : आपल्या दिवासाची सुरुवात चहाच्या कपाने (Cup Of Tea) होते. अगदी संध्याकाळीसुद्धा थकवा जाण्यासाठी चहा होतोच. आपल्या देशात तर चहा हे एक लोकप्रिय पेय (Popular Drink) आहे. चहा जास्त पिणं तसं आरोग्यासाठी घातक (Harmful For Health) असतं. पण, रोज एक किंवा दोन कप चहा घेत असाल तर, हा चहाच इम्युनिटी (Immunity) वाढवू शकतो. चहा करताना त्यात घातलेला एक आल्याचा (Ginger) छोटासा तुकडाही कमाल करू शकतो. आल्यात अनेक औषधी गुणधर्म (Medical Properties) आहेत त्यामुळे पावसाळ्यात बळावणाऱ्या आजारांपासून संरक्षण (Protection from Diseases in Rainy Season) करू शकतो.

यात अ‍ॅन्टीइम्फ्लेमेट्री, अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट, अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरावर येणारी सुज आणि संसर्गापासून संरक्षण (Protection from Infection) होतं. याशिवाय व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन ई,आयर्न,व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम देखील असतात. त्यामुळे सर्दी आणि खोकल्यापासून (Cold & Cough) संरक्षण होतं.

सर्दी-खोकल्यात फायदा

पावसाळ्यात आल्याचा चहा घेतल्याने सर्दी-खोकल्याध्ये खूप फायदा होतो. त्यात असलेले अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म आपलं संसर्गापासून संरक्षण करतात,ज्यामुळे खोकला आणि सर्दी दूर राहते.

(सावधान! 'गुगल डॉक्टर' तुम्हाला पाडतोय आजारी)

इम्युनिटी वाढते

अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म आल्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात त्युमुळे रोग प्रतिकारशक्ती वढते. आल्यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी सुद्धा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

(युरिन इन्फेक्शनसाठी ऋजुता दिवेकर यांनी दिला नीरा पिण्याचा सल्ला; पाहा VIDEO)

चरबी कमी होते

सकाळी सकाळी आल्याचा चहा पिण्याची सवय लावली वजन नियंत्रणात येण्यात मदत होते. आल्यातील कोर्टिसोल शरीरात साठवलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यात उपयुक्त ठरतो.

(ही वाईट सवय तुम्हालाही नाही ना ? चुकूनही पिऊ नका या वेळी चहा)

पचन सुधारतं

गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या असेल तर, आल्याचा चहा घ्यावा. त्यामुळे पाचनच्या सगळ्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Tea, Tea drinker