कोणत्याही पदार्थाला फोडणी दिली की त्याचा घमघमाट घरात पसरतो. मोहरी रोजच्या जेवणात वापरली जाते कारण, मोहरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जेवणाशिवाय मोहरी आणि मोहरीचं तेल वापरून आपण आरोग्य विषयक समस्या संपवू शकतो.
मोहरीच्या बियांचा वापर नैसर्गिक स्क्रब म्हणून करता येतो. मोहरी बिया आणि गुलाबपाणी अकत्र करून त्याची पेस्ट करावी ही पेस्ट चेहऱ्यावर लावूव हलक्या हाताने मॉलिश करावी, त्यामुळे डेड स्किन निघुन जाते.
मोहरी पचनाच्या समस्या कमी करते. त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात. त्यामुळे एक चमचा मोहरी फोडणीसाठी वापरतात.
मोहरीच्या तेलात अॅन्टी-ऑक्सिडन्ट्स गुण असतात. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, आग होणे असे त्रास कमी होतात. या तेलाने त्वचेची मॉलिश करावी.
छातीत झालेला कफ कमी करण्यासाठी मोहरी आणि मीठ घालून काढा तयार करावा. हा काढा प्यायल्यानंतर उलटी होऊन कफ पडतो. मात्र हा उपाय वृद्धांनी किंवा हृदयाचा त्रास असलेल्यांनी करू नये. छातीत झालेला कफ कमी करण्यासाठी मोहरी आणि मीठ घालून काढा तयार करावा. हा काढा प्यायल्यानंतर उलटी होऊन कफ पडतो. मात्र हा उपाय वृद्धांनी किंवा हृदयाचा त्रास असलेल्यांनी करू नये.
केसांसाठी मोहरीचं तेल वापरता येतं. केसात कोंडा झाला असेल, खाज येत असेल तर, मोहरीच्या तेलाने मॉलिश करावी.
त्वचेवर रॅशेस येत असतील तर, मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून लावा. मोहरीत अॅन्टी-बॅक्टेरियाल आणि अॅन्टी-फंगल गुणधर्म असतात.
मोहरीच्या तेलात मीठ घालून दात घासल्यास दात चमकदार होतात. नियमितपणे वापरल्यास दातही खराब होत नाहीत.