मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काळे तांदूळ, काळा लसूणसुद्धा... ‘Black Food’चा फायदा माहिती आहे का?

काळे तांदूळ, काळा लसूणसुद्धा... ‘Black Food’चा फायदा माहिती आहे का?

डायबिटीज, हृदयरोग, कॅन्सर सारख्या आजारात काळ्या पदार्थांनी फायदा मिळू शकतो.

डायबिटीज, हृदयरोग, कॅन्सर सारख्या आजारात काळ्या पदार्थांनी फायदा मिळू शकतो.

काळ्या रंगामुळे (Black Colour Food) आपण ते पदार्थ खाणं टाळतो किंवा त्यांचा आरोग्यासाठी किती फायदा (Benefits for Health) आहे हे आपल्याला माहितीच नसतं.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 24 जून: आपल्याला आहारामध्ये फळं, भाज्या यांचा वापर किती महत्त्वाचा आहे (Importance of Fruit & Vegetable) हे आपल्याला माहिती आहेच. पालेभाज्या खाल्ल्यामुळे रक्त वाढतं तर, फळं खाल्ल्यामुळे भरपूर न्यूट्रिशन्स आणि व्हिटॅमिन्स (Vitamins) मिळतात मात्र, काही असे काही पदार्थ असतात ज्यांच्या काळ्या रंगामुळे (Black Colour Food) आपण ते खाणं टाळतो किंवा खरंच त्यांचा आरोग्यासाठी किती फायदा (Benefits for Health) आहे हे आपल्याला माहितीच नसतं. याच पदार्थांमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. डायबिटीज, हृदयरोग, कॅन्सर सारख्या आजारात देखील या पदार्थांनी फायदा मिळू शकतो. तर, जाणून घेऊ या काळ्या रंगाचे आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ. काळे तांदूळ काळे तांदूळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. यामध्ये एंथोसायनिन मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे शरीरावरील सूज कमी होते, तांदळाच्या वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात पण, तांदळाला पॉलिश केल्यामुळे हे पोषक घटक कमी होतात. ( भाज्या खा पण जरा जपून; अतिसेवनाने देखील होतात वाईट परिणाम) काळे तांदूळ पॉलिश केले जात नाहीत. त्यामुळे यामध्ये फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात. ज्याचा उपयोग टाईप 2 डायबिटीसजचा त्रास कमी करण्यात होतो. वजन कंट्रोल करण्यासाठी आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील काळे चांगले उपयोगी येतात. (बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करा; ही 5 योगासनं आहेत फायदेशीर) काळ लसूण तुम्हाला सफेद लसणाबद्दल तर माहिती असेल मात्र काळ्या लसणामध्ये देखील अद्भूत फायदे आहेत. या लसणामध्ये ऍन्टिऑक्सिडंट आणि व्हिटॅमीन सी असतं. जे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. काळ लसूण खाल्ल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं, इन्फेक्शन आणि कॅन्सर सारख्या आजारावरही ते फायदेशीर ठरतं. ब्लॅकबेरी आपण स्ट्रॉबेरी आवडीने खातो मात्र, ब्लॅकबेरी जास्त खात नाही. ब्लॅकबेरीमुळे होणारे फायदे माहिती आहेत का ? ब्लॅकबेरीमुळे शरीरावरची सुज कमी होते. मासिक पाळीचा त्रास असेल तर ब्लॅकबेरी खावी. आपल्या त्वचेचा पोत सुधारतो. शरीरात कॅन्सर पेशींच्या वाढीवर देखील ब्लॅकबेरी नियंत्रण आणते. (Delta plus असो की दुसरा व्हेरिएंट; कोरोनाच्या प्रत्येक रूपापासून बचावाचा उपाय) काळा चहा काळ्या चहामध्ये पॉलीफेनोल्स असतं. जे डेड सेल्स कमी करून फ्री रॅडिकल्स काढण्यात मदत करतं. संशोधनानुसार कोलेस्ट्रॉल कमी करणं, लठ्ठपणा कमी करणं, डायबिटीस यासारख्या आजारांमध्ये काळा चहा उपयोगी ठरतो. (Photography मध्ये करिअर करण्याचा विचार करताय? इथे मिळेल संपूर्ण माहिती) काळे अंजीर काळ्या अंजीरामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. यात फायबरच प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पचन संदर्भातले आजार कमी होऊन वजन कमी होतं. काळ्या अंजिरामध्ये कॅन्सरशी लढण्याची क्षमता असते.
First published:

Tags: Food, Superfood, Tasty food

पुढील बातम्या