मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Photography मध्ये करिअर करण्याचा विचार करताय? बेस्ट कॉलेजेसपासून पगारापर्यंत; इथे मिळेल संपूर्ण माहिती

Photography मध्ये करिअर करण्याचा विचार करताय? बेस्ट कॉलेजेसपासून पगारापर्यंत; इथे मिळेल संपूर्ण माहिती

आज आम्ही तुम्हाला फोटोग्राफीतील करिअरच्या संधींबद्दल सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला फोटोग्राफीतील करिअरच्या संधींबद्दल सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला फोटोग्राफीतील करिअरच्या संधींबद्दल सांगणार आहोत.

मुंबई, 23 जून: कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला (Road trip Destinations) जाण्यापासून ते अगदी कुठली नवीन वस्तू घेतल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण फोटो काढायला विसरत नाही. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर (Social Media Accounts) नेहमीच फोटो अपडेट करत असतो. सर्व गोष्टींचे फोटो आपण काढत असतो. काही लोक यासाठी नवीन चांगला कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स (Smartphones with good Camera) किंवा DSLR कॅमेराही (DSLR Camera) खरेदी करतात. अनेकांना बाहेर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन फोटोग्राफी (Photography) करण्याची आवड असते तर काहींना माणसांचे फोटो काढायला आवडतात. फोटोग्राफीमध्ये करिअर (Career in Photography) करण्याचा विचार तुम्हीही केला असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला फोटोग्राफीतील करिअरच्या संधींबद्दल सांगणार आहोत.

शैक्षणिक पात्रता

फोटोग्राफीमध्ये करिअर (Career in Photography) करण्यासाठी अनेक डिग्री (Degree in photography) आणि डिप्लोमा (PG Diploma in photography) कोर्सेस आहेत. त्यासाठी तुम्हाला दहावी आणि बारावी करणं आवश्यक आहे. यानंतर जर तुम्ही पदवी घेऊ इच्छित असाल तर घेऊ शकता. फोटोग्राफर होण्यासाठी कोणत्याही स्ट्रीममधील पदवी घेता येऊ शकते. तसंच फोटोग्राफीचा कोर्स करणं महत्त्वाचं आहे.

अंगी हे गुण असणं आवश्यक

फोटोग्राफर व्हायचं असेल तर सर्वात आधी फोटोग्राफीचे बारकावे (Basics of Photography) माहिती असणं आवश्यक आहे. आपण दैनंदिन जीवनात जे फोटो किंवा सेल्फी काढतो ते म्हणजे फोटोग्राफी नव्हे हे माहिती असणंही आवश्यक आहे. ज्यांना कठोर परिश्रम कसे करावे आणि धैर्य कसं ठेवावं हे माहित आहे हे क्षेत्र त्यांच्यासाठी आहे.

हे वाचा -बारावीनंतर कॉमर्समध्ये करिअर करायचंय? मग हे कोर्सेस करा आणि मिळवा भरपूर पगार

फोटोग्राफीचे काही प्रकार

फोटो जर्नलिझम (Photo Journalism)

फॅशन फोटोग्राफी (Fashion Photography)

पोर्ट्रेट फोटोग्राफी (Portrait Photography)

स्ट्रीट फोटोग्राफी (Street Photography)

नाईट फोटोग्राफी (Night Photography)

ऍस्ट्रोफोटोग्राफी (Astro Photography)

नेचर फोटोग्राफी (Nature Photography)

फोटोग्राफी शिकण्यासाठी काही कॉलेजेस

जामिया मिलिया इंस्टिट्यूट ऑफ मास कम्यूनिकेशन रिसर्च सेंटर, नई दिल्ली.

फिल्म ऐंड टेलिविज़न इंस्टिट्यूट (एफटीआई) पुणे.

एशियन अकैडमी ऑफ फिल्म ऐंड टेलिविज़न, दिल्ली.

जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई.

सेंट ज़ेवियर्स कॉलेज, मुंबई.

फरग्युसन कॉलेज, पुणे.

किती मिळेल पगार

आजकाल फोटोग्राफर्सना अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत. मीडिया क्षेत्रात फोटो जर्नलिस्ट म्हणून, जाहिरात क्षेत्रांत, सोशल मीडियात अनेक नोकरीच्या संधी आहेत. तसंच यात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचीही संधी आहे. नोकरी करताना फोटोग्राफरला साधारणतः 15,000 - 20,000 प्रति महिना पगार मिळू शकतो. तर व्यवसाय करताना तुम्हाला मिळणाऱ्या कामावर पैसे अवलंबून असतील.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Mumbai, Photography