दिल्ली, 24 जून: इमयुनिटी (Immunity) चांगली ठेवायची असेल तर, आपला आहार चांगला (Healthy Diet) असायला पाहिजे. फळं, भाज्या, कडधान्य, ड्रायफ्रूट्स यांचा समावेश आपल्या आहारात करायलाच पाहिजे. यामुळे आपल्याला व्हिटॅमीन्स आणि प्रोटिन्स (Vitamin & Protein) मिळतात. त्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते. व्हायरल इन्फेक्शनपासून (Viral Infection) बचाव करायचा असेल तर, इम्युनिटी चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र काही लोक आवडत्या भाज्या, फळं अति प्रमाणात खातात आणि मग त्यांना त्याचे दुष्परिणाम (Side Effects) भोगावे लागतात. प्रमाणापेक्षा जास्त भाज्या खाणं हानिकारक असतं. काही भाज्यांचं अतिसेवन आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतं. पाहुयात कोणत्या भाज्या अति प्रमाणात खाऊ नयेत.
बीट
बीट खाल्ल्यामुळे शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढतं. वजन कमी करायचं असेल तरी बीट उपयोगी आहे. बीटचा वापर सॅलड आणि सँडविचमध्ये केला जातो. काही लोक बिटचा ज्युस देखील आवडीने पितात. मात्र, अति प्रमाणामध्ये खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सालेट असतं. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. याशिवाय बीट जास्त प्रमाणात खाल्लं तर शरीरात कॅल्शियमच्या शोषणामध्ये अडचण येते.
बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करा; ही 5 योगासनं आहेत फायदेशीर
गाजर
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असलेलं गाजर जास्त प्रमाणात खाल्लं तर आपल्या त्वचेवर त्याचे वाईट परिणाम होतात. गाजरामध्ये बिटा केरोटीन असतं जे आपल्या शरीरात जास्त गेलं तर ब्लडमध्ये जाण्याऐवजी त्वचेवर जमा व्हायला लागतं. ज्यामुळे हात,पाय,टाचांचा रंग शेंदरी आणि पिवळा दिसायला लागतो.
कच्च्या भाज्या
फ्लॉवर,कोबी, ब्रोकोली यांचा वापर सॅलडमध्ये केला जातो मात्र, या कच्च्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस आणि अपचन सारखे त्रास होतात. या भाज्या कच्च्या असताना त्यामध्ये पोटात न विरघळणारी शुगर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या भाज्या कच्च्या खाण्यापेक्षा वाफवून खाव्यात.
वांगं
वांग्यामध्ये सोलनिन आणि गैस्ट्रोइंटेस्टायनल त्रासाल कारणीभूत ठरू शकतं. वांगं खाल्ल्यामुळे होणारे साईड इफेक्ट टाळण्यासाठी नेहमीच वांग व्यवस्थित शिजवून आणि प्रमाणामध्ये खावं. काही लोकांना वांगं खाल्यानंतर उलटी, चक्कर, पोट दुखीचा त्रास होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Vegetables