• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • पैसे चुकीच्या खात्यात जमा झाले? घाबरू नका, वापरा ही ट्रिक

पैसे चुकीच्या खात्यात जमा झाले? घाबरू नका, वापरा ही ट्रिक

ऑनलाइन व्यवहार (Online Transactions) सुलभ असले, तरी ते अत्यंत काळजीपूर्वक करावे लागतात. कारण आपल्या बँक खात्याच्या इंटरनेट बँकिंगचे तपशील कोणाच्या हाती लागले, तर धोकादायक ठरू शकतं.

 • Share this:
  मुंबई 19 जुलैबँकिंगचे व्यवहार (Banking Transactions) आता अगदी सुलभ झाले आहेत. पैसे काढण्यासाठी एटीएम आहेत. पैसे कोणाला पाठवायचे असतील, तर इंटरनेट बँकिंग (Internet Banking) आहे, यूपीआय (UPI) आहे, वेगवेगळी अॅप्स, मोबाइल वॉलेट्स (Mobile Wallets) आहेत. ही कामं अगदी चुटकीसरशी घरबसल्या किंवा आपण जिथे असू तिथून होऊ शकतात. प्रत्यक्ष बँकेत जाऊनच करावं लागतं, अशी कामं फारच कमी आहेत. ऑनलाइन व्यवहार (Online Transactions) सुलभ असले, तरी ते अत्यंत काळजीपूर्वक करावे लागतात. कारण आपल्या बँक खात्याच्या इंटरनेट बँकिंगचे तपशील कोणाच्या हाती लागले, तर धोकादायक ठरू शकतं. शिवाय आणखी एक धोका त्यात असतो. तो म्हणजे पैसे चुकीच्या खात्यात पाठवले जाणं. ही चूक पैसे पाठवताना कोणाकडूनही होऊ शकते. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीचा बँक अकाउंट नंबर, तसंच आयएफएससी यात काही चूक झाली, तर ते पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. अशा वेळी काय करायचं असा प्रश्न पडतो. आपले पैसे परत मिळतील की नाही, अशी भीतीही वाटते. मग अशा वेळी नेमकं काय करायचं, याची माहिती 'झी न्यूज'ने प्रसिद्ध केली आहे. आता ATM मधून रक्कम काढणं महागणार, एटीएम कॅश विड्रॉल चार्ज, कार्ड्सचं शुल्क वाढणार असा प्रकार घडूच नये म्हणून काय करायचं हे आधी पाहू. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्याला त्याच्या पासबुकचा फोटो पाठवायला सांगावा. म्हणजे त्याच्याकडून नंबर पाठवण्यात होणारी संभाव्य चूक टाळता येऊ शकते. त्यानंतर प्रत्यक्ष व्यवहारावेळी आपण तो नंबर वाचून लिहिल्यावर तो योग्य लिहिला असल्याची खात्री दोन वेळा करावी. IFSC देखील योग्य असल्याची खात्री करावी. एवढी दक्षता घेतल्यावर पैसे भलत्याच खात्यात जाण्याची शक्यता पूर्णतः नाहीशी होते. पैसे पाठवताना तुम्ही नंबर टाकायला चुकलात आणि पैसे भलत्याच खात्यात गेले, तर त्या चुकीसाठी बँकेला जबाबदार धरता येत नाही. त्यामुळे ही काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचंच आहे. चूक होऊन लिहिला गेलेला खाते नंबर आणि IFSC कोड अस्तित्वातच नसेल, तर पैसे डेबिट (Debit) झाले, तरी अन्य कुठल्याही खात्यात जमा न होता परत आपल्याच खात्यात येतात. अन्य काही चूक होऊन पैसे भलत्याच खात्यात गेले असल्याची खात्री झाली, तर आपल्या बँकेशी तातडीने संपर्क साधावा. बँक मॅनेजरशी संपर्क साधून त्याला या प्रकाराची कल्पना द्यावी. तुमच्याच बँक शाखेतल्या दुसऱ्या कोणाच्या खात्यात किंवा तुमच्याच बँकेच्या अन्य कोणत्या शाखेत पैसे जमा झाले असतील, तर पैसे तुमच्या खात्यात वळते करायला फारसा वेळ लागत नाही. 20 वर्षांनी दरमहा दीड लाख रुपये मिळवायचे आहेत? मग आता करा इतकी गुंतवणूक पैसे दुसऱ्या बँकेच्या खात्यात गेले असले, तर मात्र परत मिळवण्यासाठी जास्त वेळ लागतो. काही वेळा त्यासाठी दोन महिनेही लागू शकतात. तुमच्या बँकेशी संपर्क साधून तुम्ही पैसे नेमके कुठे गेलेयत, याची माहिती घेऊ शकता. त्या बँकेशी संपर्क साधूनही तुम्ही पैसे परत पाठवण्याची विनंती करू शकता. ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे पाठवले गेले आहेत, त्या खातेदाराला संबंधित बँक या प्रकाराची कल्पना देते. त्यानंतर ते पैसे पुन्हा मूळ खात्यात जमा करण्याची परवानगीही त्या खातेदाराकडे मागितली जाते. पैसे चुकून ज्या व्यक्तीच्या खात्यात गेले आहेत, त्या व्यक्तीने परत करण्यास नकार दिला, तर त्याच्या विरोधात कोर्टात केसही दाखल करता येते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, लाभार्थ्याच्या खात्याची योग्य माहिती देणं ही पैसे पाठवणाऱ्याचीच जबाबदारी आहे. अलीकडे कोणतंही ट्रान्झॅक्शन केल्यावर येणाऱ्या मेसेजमध्ये एक नंबर दिलेला असतो. व्यवहारात काही चूक झाली असली, तर त्या नंबरवर संपर्क साधायचा असतो. चुकीच्या खात्यात गेलेले पैसे योग्य खात्यात वळते करण्याची जबाबदारी बँकेकडे असते.
  First published: