मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावध व्हा! या 3 चुका केल्यास फोनच्या बॅटरीचा होऊ शकतो Blast

सावध व्हा! या 3 चुका केल्यास फोनच्या बॅटरीचा होऊ शकतो Blast

मोबाइलच्या मर्यादित वापरासोबतच त्याची देखभाल सुद्धा गरजेची असते. कारण मोबाईल एक इलेक्ट्रॉनिक गॅझेट (Electronic Gadget) आहे. ज्याकडे दुर्लक्ष केलं तर ते त्रासदायक ठरू शकतं.

मोबाइलच्या मर्यादित वापरासोबतच त्याची देखभाल सुद्धा गरजेची असते. कारण मोबाईल एक इलेक्ट्रॉनिक गॅझेट (Electronic Gadget) आहे. ज्याकडे दुर्लक्ष केलं तर ते त्रासदायक ठरू शकतं.

मोबाइलच्या मर्यादित वापरासोबतच त्याची देखभाल सुद्धा गरजेची असते. कारण मोबाईल एक इलेक्ट्रॉनिक गॅझेट (Electronic Gadget) आहे. ज्याकडे दुर्लक्ष केलं तर ते त्रासदायक ठरू शकतं.

मुंबई 19 जुलै: आज मोबाईल फोन (Mobile Phone) प्रत्येक व्यक्तीची गरज बनला आहे. काही वेळ मोबाईल बंद असेल तर लोकांना चैन पडत नाही. मात्र मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर आवश्यक आहे. तो वापरताना सावधानी बाळगावी लागते. मोबाइलच्या मर्यादित वापरासोबतच त्याची देखभाल सुद्धा गरजेची असते. कारण मोबाईल एक इलेक्ट्रॉनिक गॅझेट (Electronic Gadget) आहे. ज्याकडे दुर्लक्ष केलं तर ते त्रासदायक ठरू शकतं.

आपण बऱ्याचदा मोबाईलचा स्फोट झाल्याचा घटना वाचल्या किंवा ऐकल्या असतील. अशा घटना मोबाईलची बॅटरी (Battery) फुटल्याने होतात. या घटना काही वेळा जीवघेण्या सुद्धा ठरतात. त्यामुळे मोबाईलची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. अशा घटना होऊ नये, याकरिता कोणती आवश्यक खबरदारी घेणं गरजेचं आहे याविषयी जाणून घेऊया.

5G फोनवर Xiaomi ची नवीन ऑफर, 8GB RAM च्या मोबाईलवर तब्बल 2000 रुपयांची सूट

मोबाईल चार्जिंग करताना मोबाईलभोवती रेडिएशनचे (Radiation) प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मोबाइलची बॅटरी गरम होते. त्यामुळे मोबाईल चार्जिंगला (Charging) लावलेला असताना फोनवर बोलू नका. अन्यथा अशावेळी मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या फोनची स्क्रीन ब्लर झाली असेल तर स्क्रीनमध्ये पूर्ण डार्कनेस (Darkness) येतो. अशावेळी मोबाईल वापरू नये. फोन वारंवार हँग (Hang) होत असेल किंवा तो स्लो झाला असेल तर अशावेळी सुद्धा बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

गुगल क्रोम वापरत असाल तर ब्राउझर तातडीने अपडेट करा अन्यथा चोरी होऊ शकतो तुमचा डेटा

अशा घटनांत आवश्यक ती खबरदारी घेतली तर त्या रोखता येतात. यासाठी आपल्या मोबाईलची वारंवार तपासणी करणं गरजेचं आहे. बॅटरी खराब झाली आहे का, याची पडताळणी करणं अत्यंत सोपं आहे. यासाठी आपल्या मोबाईलला बॅटरी रिमूव्ह (Remove) करण्याचा पर्याय असेल तर बॅटरी काढून एका टेबलावर ठेवावी. ती बॅटरी टेबलावर गोल फिरवावी. बॅटरी फुगलेली असेल तर वेगाने फिरेल. बॅटरी चांगल्या स्थितीत असेल म्हणजे खराब झालेली नसेल तर वेगाने फिरत नाही. बॅटरी वेगाने फिरत असल्यास लवकर बॅटरी बदलावी. मात्र जर आपल्या मोबाईल फोनला इनबिल्ट (inbuilt) बॅटरी असेल तर अशावेळी सुद्धा आपण बॅटरी खराब झालेली आहे की नाही ते तपासू शकता. इनबिल्ट बॅटरी असलेला मोबाईल गरम होत असल्यास त्वरित असा मोबाईल चेक करून घ्यावा.

नवं फीचर! आता WhatsApp वर बिनधास्त पाठवा HD Photo, क्वॉलिटी खराब होण्याचं नो टेन्शन

बऱ्याच लोकांना पूर्ण चार्जिंग संपल्यावर मोबाईल चार्ज करण्याची सवय असते. मात्र असं अजिबात करू नये. आपल्या मोबाईल फोनची बॅटरी 20 टक्के शिल्लक राहिली असताना मोबाईल चार्जिंगला लावावा. बॅटरी पूर्णपणे संपू देऊ नये. तसंच डुप्लिकेट (Duplicate) चार्जर किंवा बॅटरीचा वापर करू नये. आपल्याकडे ज्या कंपनीचा मोबाईल फोन आहे त्याच कंपनीचा चार्जर आणि बॅटरी असावी. तसंच फोनच्या चार्जरची पिन कधीही ओली होऊ देऊ नका. चार्जिंग पिन पूर्णतः कोरडी असेल तरच मोबाईल चार्जिंगला लावा. अशा प्रकारे सर्व काळजी घेतली आणि बॅटरी खराब झालेली असेल तर त्वरित बदलली तर मोठी हानी आपण नक्कीच टाळू शकतो. त्या दृष्टीने सांगितलेली आवश्यक खबरदारी घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphone, Technology