मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /धक्कादायक! चिनी लोक गर्भनाळही सोडत नाहीत; बाळाला जन्म देताच आईसुद्धा पिते Placenta सूप

धक्कादायक! चिनी लोक गर्भनाळही सोडत नाहीत; बाळाला जन्म देताच आईसुद्धा पिते Placenta सूप

चिनी (China) लोक आई आणि बाळाला पोटात जोडणाऱ्या गर्भनाळेचं गर्भवेष्टनही (Placenta eating) खातात. ही एक आणखी विचित्र परंपरा (Weird Culture)  इथं आहे.

चिनी (China) लोक आई आणि बाळाला पोटात जोडणाऱ्या गर्भनाळेचं गर्भवेष्टनही (Placenta eating) खातात. ही एक आणखी विचित्र परंपरा (Weird Culture) इथं आहे.

चिनी (China) लोक आई आणि बाळाला पोटात जोडणाऱ्या गर्भनाळेचं गर्भवेष्टनही (Placenta eating) खातात. ही एक आणखी विचित्र परंपरा (Weird Culture) इथं आहे.

बीजिंग, 19 जुलै: चीनमध्ये (China) खाण्यापिण्याच्या विचित्र सवयीबाबत तर सर्वांना माहितीच आहे. अगदी कोणत्याही मांसापासून ते जिवंत प्राणी-कीटकही लोक इथं खातात. पण या पलिकडेही तुम्हाला माहिती नसेल. इथं लोक आई आणि बाळाला पोटात जोडणाऱ्या गर्भनाळेचं गर्भवेष्टनही (Placenta eating) खातात. ही एक आणखी विचित्र परंपरा (Weird Culture)  इथं आहे.

चीनमध्ये याला प्लेसेंटोफॅगी (Placentophagy or Placentophagia) असं म्हणतात. प्लेसेंटामध्ये  (Placenta) मध्ये भरपूर पोषक घटक असतात असं इथले लोक मानतात. अगदी आईसुद्धा बाळाच्या जन्मानंतर आपल्या बाळाची नाळ स्वतःच खाते. किती तरी वेळा रुग्णालयात याची चोरीसुद्धा होते आणि बाहेर ही नाळ जास्त दराने विकली जाते महागड्या औषधांच्या किमतीप्रमाणेच याची विक्री होते. हे सुकवून त्याचा औषधाप्रमाणे वापर केला जातो. किती तरी लोक याचं सूप बनवून पितात.

हे वाचा - कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट! संसर्गजन्य Monkeypox चा रुग्ण आढळल्यानं खळबळ

माहितीनुसार चीनमधील लोकांच्या मते, गर्भनाळ खाल्ल्याने महिलेला बाळाला जन्माला दिल्यानंतर ताण जाणपवत नाही. सोबतच त्या तरुण दिसण्यास मदत होते.  पुरुषांच्या नपुंसकतेचासुद्धा हा उपचार आहे, असं सांगितलं जातं. पण गर्भनाळ खाल्ल्याने होणाऱ्या फायद्यांच्या दाव्याबाबत कोणत्याही तज्ज्ञांनी पुष्टी केलेली नाही.

उलट डॉक्टर सांगतात ही असं केल्याने दुष्परिणाम होऊ शकतो. यात व्हायरस असू शकतो. टेक्सास युनिव्हर्सिटीतील ़डॉक्टरांनी सांगितलं की, प्लेसेंटा आईपासून मिळणारे पोषक घटक बाळापर्यंत फिल्टर करून पोहोचवतं. यात घातक बॅक्टेरिया आणि व्हायरस असू शकतात. हे खाल्ल्याने अनेक आजारही होऊ शकतात.

हे वाचा - Ivermectin: कोरोनाच्या उपचारासाठी तुम्ही घेतलं होत्या का या गोळ्या? नवा वाद सुरू

2016 मध्ये सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने एक अभ्यास केला होता. हे संशोधन अशा आईवर करण्यात आलं होतं, जिच्या मुलाच्या रक्तात आधीपासूनच गंभीर संक्रमण होतं. या मुलाची आई त्याच्या जन्मनंतर दररोज प्लेसेंटापासून बनललेलं कॅप्सूल खात होती. त्यावेळी ती आपल्या बाळाला दूधही पाजत होती आणि त्यामुळे संक्रमण मुलापर्यंत पोहोचलं, असं या संशोधनात दिसून आलं.

First published:

Tags: China, Health, Lifestyle