मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लग्नानंतर जंगलात फक्त एक रात्र घालवायला गेलं नवं जोडपं; तब्बल 10 दिवस देत होते जीवनमृत्यूशी झुंज

लग्नानंतर जंगलात फक्त एक रात्र घालवायला गेलं नवं जोडपं; तब्बल 10 दिवस देत होते जीवनमृत्यूशी झुंज

तब्बल 10 दिवस या कपलने जंगलात (Couple spent 10 days on tree) अशा परिस्थितीचा सामना केला ज्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल

तब्बल 10 दिवस या कपलने जंगलात (Couple spent 10 days on tree) अशा परिस्थितीचा सामना केला ज्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल

तब्बल 10 दिवस या कपलने जंगलात (Couple spent 10 days on tree) अशा परिस्थितीचा सामना केला ज्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल

  • Published by:  Priya Lad

मॉस्को, 19 जुलै: सामान्यपणे लग्नानंतर नवं जोडपं (Newly married couple) हनीमूनला एखाद्या रोमँटिक ठिकाणी फिरायला जातं. पण रशियातील एका कपलने मात्र रोमँटिक ठिकाणाऐवजी हौस म्हणून जंगलाच (Couple in jungle) फिरण्याचा विचार केला. ते लोक जंगलात फिरायलाही गेले. त्यानंतर जंगलात जे घडलं ते त्यांच्यासाठी एखाद्या भयंकर स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. तब्बल 10 दिवस या कपलने जंगलात (Couple spent 10 days on tree) अशा परिस्थितीचा सामना केला ज्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल (Horror Story of Jungle).

अँटोन आणि निना बोगडानोव्ह लग्नानंतर एडव्हेंचर म्हणून जंगलात एक रात्र घालवण्यासाठी गेले. जंगलात त्यांची गाडी एका खोल खड्ड्यात अडकली आणि इथूनच त्यांचा भयानक प्रवास सुरू झाला. जिथं हे कपल अडकलं तिथं ना मोबाइल कव्हरेज होतं, ना दुसरी गाडी. तिथून त्यांनी चालतच Banniye Springs  च्या टुरिस्ट बेसवर जाण्याचा विचार केला. तितक्यात त्यांना एक अस्वल त्यांच्या दिशेनं येतात दिसलं.

सुरुवातीला त्यांंनी अस्वलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. ते घाबरलंसुद्धा त्यानंतर या कपलनं तिथून पळ काढला. पुढे जाऊन हे कपल अस्वलापासून आपला जीव वाचवण्यासाठी एका झाडावर चढलं. दोन दिवस त्यांनी या झाडावर काढले. दोन दिवसांनी त्यांनी त्या झाडावर उतरून नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जायचा विचार केला. जसे ते नदी ओलांडण्यासाठी किनाऱ्यावर पोहोचले तसं अस्वल धावत त्यांच्यामागे आलं आणि मग त्यांना पुन्हा झाडावर चढावं लागलं. अस्वलही त्यांची झाडाखाली बसून वाट पाहत होता.

हे वाचा - चिनी लोक गर्भनाळही सोडत नाहीत; बाळाला जन्म देताच आईसुद्धा पिते प्लेसेंटा सूप

नीना म्हणाली, अस्वलाने एका वेळी तिच्या नवऱ्याला जवळजवळ मारूनच टाकलं होतं. पण तिने पाण्याची बाटली फेकून अस्वलाचं लक्ष विचलित केलं आणि तिचा नवरा झाडावर चढला. दोन दिवस ते त्याच झाडावर होते आणि अस्वलही तिथं खाली उभा राहून त्यांना तिथं पाहतच होता.

एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एक झोपायचा तर दुसरा जागं राहून अस्वलापासून पहारा द्यायचा. असे त्यांनी तब्बल 10 दिवस घालवले. त्यांच्याकडे खायलासुद्धा काहीच नव्हतं आणि थंडीने गारठले होते.  अस्वलसुद्धा 10 दिवस तिथून हटलं नाही. 10 दिवस या कपलची जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर अस्वलाने हार मानली आणि तो दुसऱ्या शिकारीच्या शोधात निघून गेला.

हे वाचा - फक्त 2 दिवसांसाठी सासूचा बॉयफ्रेंड व्हा 72 हजार रुपये घेऊन जा; सूनबाईने दिली ऑफर

कसंबसं हे कपल आपल्या गाडीपर्यंत पोहोचलं. तेव्हा तिथं त्यांना आणखी काही गाड्या दिसल्या, बचाव पथकही दिसलं. तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला. यानंतर कपललं समजलं की ते अशा जंगलात होते, तिथं जवळपास 23 हजार जंगली अस्वल राहतात. गेल्या वर्षी या अस्वलांनी 4 जणांना आपलं शिकारही बनवलं होतं.

First published:

Tags: Couple, Horror, World news