मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Coronavirus: रेस्टॉरंटमध्ये जाताना जरा जपून! या ठिकाणी असू शकतो कोरोना

Coronavirus: रेस्टॉरंटमध्ये जाताना जरा जपून! या ठिकाणी असू शकतो कोरोना

हॉटेलमध्ये किंवा  रेस्टॉरंटमध्ये जाणं महागात पडू शकतं.

हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाणं महागात पडू शकतं.

अनलॉक (Coronavirus Unlock) व्हायला लागलेलं असताना रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) जाण्याचा विचार करत असाल तर, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं हे आधी जाणून घ्या.

मुंबई, 14 जून : कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या आता कमी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथील व्हायला सुरुवात झालेली आहे. अनलॉक (Unlock) व्हायला लागल्यामुळे थोडाला दिलासा मिळालेला आहे. अनेक दिवस घरामध्ये अडकलेले लोक आता बाहेर जाऊन एन्जॉय करायचा विचार करत आहेत. पण, लॉकडाऊन जरी शिथील झालेला असला तरी,देखील कोरोना अद्याप गेलेला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती तलवार बनवून सगळ्यांवर लटकते आहे. त्यामुळे या आधी देखील कोरोना काळात पाळलेले नियम आत्ताही पाळणं आवश्यक आहे. बाहेर जाताना मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टंसिंग पाळा, सार्वजनिक ठिकाणी कमी वावर करा. हे नियम अजूनही पाळायला हवेत. यासंदर्भात झी न्यूजने माहिती दिली आहे.

लॉकडाऊन असल्यामुळे बाहेरचं खायची किंवा हॉटेलिंगची आवड असणाऱ्या लोकांना आता थोडासा दिलासा मिळायला लागलेला आहे मात्र, हॉटेलमध्ये किंवा  रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) जाणं महागात पडू शकतं. कारण याठिकाणी कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) होण्याची भीती आहे. रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करायचा विचार करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

रेस्टॉरंटमध्ये अनेक ठिकाणाहून लोक घेत असतात. रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी देखील वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. त्यांची तपासणी जरी केली जात असली तरी, कोरोना संसर्गाची भीती कमी होत नाही. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार असाल तर, या गोष्टी लक्षात ठेवा.

दरवाजाचे हँडल

आपण रेस्टॉरंटमध्ये आत जाताना सगळ्यात आधी हात लावतो तो दरवाजा उघडण्यासाठी त्याच्या हँडलला. तिथूनच कोरोनाचा संसर्ग होण्याचा पहिला धोका निर्माण होतो. कारण या हँडलवर दररोज हजारो हात लागलेले असतात. त्यामुळे हातातवरून कोरोनाचे विषाणू त्या हँडलला लागलेले असू शकतात. त्यामुळे रेस्टॉरंटचा दरवाजा उघडण्यासाठी हँडलला हात लावल्यानंतर लगेचच आपल्या हाताला सॅनिटायझर लावा.

(तुम्हालाही वाटतं इंटरनेट, टीव्हीमुळे बिघडतेय मुलांची भाषा? हा प्रयोग करून पाहा)

आसन व्यवस्था

रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण बसण्यासाठी एखादी जागा शोधायला लागतो.

मात्र ज्या खुर्चीवर किंवा टेबलाजवळ तुम्ही बसणार आहात त्या ठिकाणी या आधी देखील इतर व्यक्ती बसलेल्या असू शकतात. त्यामुळे खुर्चीवर बसण्याआधी किंवा टेबलाला हात लावण्याआधी तिथल्या हॉटेल स्टाफला सॅनिटाईझ करायला सांगा.

मेन्यू कार्ड

हॉटेलमध्ये दरवाजाचं हँडल, टेबल-खुर्ची या ज्याप्रकारे कोरोनाचे वाहक ठरू शकतात. तसाच एक मोठा वाहक ठरू शकतो मेन्यूकार्ड. हॉटेलमध्ये ऑर्डर देण्यासाठी आपण मेनू कार्ड हातामध्ये घेतो. मात्र हेच मेनूकार्ड कितीजणांनी हाताळलं आहे याची आपल्याला कल्पना देखील नसते. त्यामुळे मेन्यूकार्डला हात लावण्याआधी ते सॅनिटाईझ करण्याची विनंती करा किंवा मेन्यूकार्डला हात लावल्यानंतर स्वतः हात सॅनिटाईझ करा.

(रोज केला ‘हा’ उपाय तर चेहरा होईल सुंदर; फॉलो करा शहनाज हुसैन यांच्या टिप्स)

टॉयलेट

कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जाते. हॉटेल,रेस्टॉरंट या ठिकाणी देखील आता जास्त स्वच्छता राखली जाते. मात्र रेस्टॉरंटमध्ये दरवेळी वापरानंतर टॉयलेट साफ करणं शक्य नसतं. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तिथलं टॉयलेट वापरतांना स्वच्छतेची काळजी घ्या. कमीत कमी वस्तूंना आपला हात लागेल याकडे लक्ष द्या. वापरानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवा.

(नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीनुसार कोरोना लशीच्या प्रभावावर काही परिणाम होतो का?)

वॉश बेसिंनचा नळ

टॉयलेटच्या वापरानंतर किंवा जेवणाआधी आपण हात धुवतो. त्याकरता रेस्टॉरंट मधल्या बेसिनच्या नळाला हात लागतोच. याच बेसिंनच्या नाळावर कोरोनाचे विषाणू असू शकतात. त्यामुळे आपले हात स्वच्छ होण्याऐवजी आपल्या हातावर कोरोनाचे विषाणू येऊ शकतात. नळाला हात लावण्यापेक्षा टिश्यू पेपरचा वापर करा किंवा आपल्या कोपराने नळ सुरू करा. हात धुतल्यानंतर देखील आपल्या हातावर सॅनिटायझर लावा.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Lockdown