मराठी बातम्या /बातम्या /explainer /नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीनुसार कोरोना लशीच्या प्रभावावर काही परिणाम होतो का?

नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीनुसार कोरोना लशीच्या प्रभावावर काही परिणाम होतो का?

कमी-अधिक रोगप्रतिकारक शक्ती असल्यास कोरोना लशीचा प्रभाव नेमका कसा होतो?

कमी-अधिक रोगप्रतिकारक शक्ती असल्यास कोरोना लशीचा प्रभाव नेमका कसा होतो?

कमी-अधिक रोगप्रतिकारक शक्ती असल्यास कोरोना लशीचा प्रभाव नेमका कसा होतो?

नवी दिल्ली, 14 जून : जगभरात पसरलेला कोरोना विषाणू संसर्ग (Corona Virus Infection) रोखण्यासाठी लसीकरण (Corona Vaccination) हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे सर्वत्र जास्तीत जास्त वेगानं लोकांचे लसीकरण करून त्यांना या विषाणू संसर्गापासून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जितक्या वेगानं आणि सार्वत्रिक लसीकरण होईल, तितक्या लवकर जग या विषाणूच्या विळख्यातून मुक्त होऊ शकेल. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत.

लशीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता याबद्दल अनेक शंका उपस्थित होत आहेत. विशेषतः इम्युनोकॉम्प्रमाईज्ड (Immunocompromised) म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती आधीच कमी असणारे किंवा ज्यांना काही आधीच मोठे आजार आहेत असे लोक लस घेण्यासाठी घाबरत आहेत. त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न.

रोगप्रतिकार शक्ती (Immunity) म्हणजे काय?

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या शरीराची असलेली नैसर्गिक संरक्षण यंत्रणा. सोप्या भाषेत सांगायचं तर मानवी शरीरात कोणत्याही शरीराबाहेरच्या गोष्टीशी लढायची शक्ती असते त्यालाच रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात. या रोगप्रतिकार शक्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जन्मजात निसर्गदत्त (Innate) आणि दुसरी बाह्यरित्या घेतलेली (Acquired). जन्मजात किंवा नैसर्गिक प्रतिकार शक्ती आपल्या जन्मापासून आपल्या शरीरात असते तर बाह्यरितीनं घेतलेली प्रतिकार शक्ती आपण गरजेनुसार बाहेरून कृत्रिम साधनांनी मिळवत असतो. जेव्हा कोरोना विषाणू (Coronavirus) आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपले शरीर त्याला बाह्यघटक, परकीय अर्थात अँटीजेन समजतं. आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी लढायला सुरुवात करते आणि त्याचवेळी पुन्हा संसर्ग झाल्यास विशिष्ट प्रतिकार शक्ती प्राप्त करण्यासाठी त्या विषाणूची रचना लक्षात ठेवते.

हे वाचा - Explainer : कोणत्या कोरोना रुग्णासाठी कोणते उपचार? कशी ठरते Corona treatment

ज्या व्यक्तींमध्ये ही रोग प्रतिकारशक्ती कमी (Immunocompromised) असते, त्यांच्यात रोग प्रतिकारशक्ती निसर्गतः चांगली असणाऱ्या व्यक्तीच्या (Immunocompetent) तुलनेत ही क्षमता कमी असते.

रोगप्रतिकार शक्ती कमी असणारे म्हणजे इम्युनोकॉम्प्रमाईज्ड कोण आहेत?

इम्युनोकॉम्प्रमाईज्ड म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती बाह्यशत्रूंशी (अँटीजेन) लढण्यास सक्षम नसते. कुपोषित, एचआयव्ही संसर्गामुळे एड्ससारख्या दीर्घ आजारानं ग्रस्त, मायकोबॅक्टेरियल संसर्गामुळे क्षयरोग असणाऱ्या, अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या, दीर्घकाळ धूम्रपान करणाऱ्या, सीओपीडी असणाऱ्या, कर्करोगग्रस्त (Cancer Patient) किंवा अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती. कर्करोगाच्या केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचारात आणि अवयव प्रत्यारोपणानंतर प्रतिकारशक्ती दडपण्यासाठी विशिष्ट औषधं वापरली जातात. अशा व्यक्तींचा या गटात समावेश होतो.

त्यांना संसर्गाचा अधिक धोका असतो का?

-होय, या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यानं त्यांना कोरोनासारखा संसर्ग लगेच होण्याची शक्यता असते.

त्यांना लसीकरण आवश्यक आहे का?

- होय, कारण रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाची शक्यता जास्त असते म्हणूनच त्यांना लसीकरण आवश्यक आहे.

- रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्या व्यक्तींइतकीच या लोकांसाठी लस उपयुक्त आहे का?

लस हे विषाणूच्या संरचनेसारखा पण त्यात रोगजन्य शक्ती नसलेली म्हणजेच शक्ती नसलेला विषाणू असलेली एक परकीय शक्ती, बाह्य घटक शरीरात सोडली जाते. या नॉन-पॅथोजेनिक अँटीजेनला अर्थात बाह्यशक्तीला प्रतिसाद म्हणून नैसर्गिकरीत्या अँटीबॉडीज (Antibodies) तयार करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती कार्यरत होते. परंतु इम्युनोकॉम्प्रमाईज्ड व्यक्तींमध्ये ही शक्ती कमी असते आणि म्हणूनच इतरांच्या तुलनेत त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते.

संसर्ग किंवा लसीकरणानंतर विकसित प्रतिकार शक्तीची स्थिती जाणून घेण्यासाठी कोणतीही चाचणी उपलब्ध आहे का?

- होय, संसर्ग किंवा लसीकरणानंतर आपल्या शरीरात विकसित झालेल्या अँटीबॉडीजचं प्रमाण शोधण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या उपलब्ध आहेत.

चाचणीत आढळलेल्या अँटीबॉडीज पुरेशा आहेत की नाहीत हे कसं समजेल?

वेगवेगळ्या विषाणूंपासून आपलं संरक्षण करण्यासाठी किती अँटीबॉडीज आवश्यक आहेत हे सांगता येत नाही. त्यामुळं चाचण्यांवरून (Tests) निर्माण झालेल्या अँटीबॉडीज पुरेशा आहेत की नाही ते सांगता येत नाही. ती व्यक्ती आधीच संक्रमित आहे किंवा लसीकरण झालेलं आहे, हे त्यावरून कळू शकतं.

ज्या लोकांच्या रक्तात अँटीबॉडीज नसतात त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते का?

अँटीबॉडीज असणं किंवा नसणं हे संसर्गापासून संरक्षणाची हमी देऊ शकत नाही. चांगल्या प्रमाणात अँटीबॉडीज असलेल्या व्यक्तीसदेखील संसर्ग होऊ शकतो किंवा अँटीबॉडीज नसलेली व्यक्तीदेखील संसर्गापासून वाचू शकते. याबाबतीत ठोसपणे सांगण्याकरता कोणत्याही चाचण्या नाहीत.

मग लसीकरणाचा उपयोग काय?

लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी लसीकरण (Vaccination) उपयुक्त ठरतं. किंवा संसर्ग झाल्यास आजाराची तीव्रता कमी असेल ज्यांनी लस घेतलेली नाही अशा लोकांच्या तुलनेत लस घेतलेल्या व्यक्तींची वाचण्याची शक्यता खूप जास्त आहे.

रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्या की नसलेल्या व्यक्तींचं लसीकरण करावं?

रोगप्रतिकार शक्तीची स्थिती विचारात न घेता, प्रत्येक व्यक्तीला लस दिली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या लोकांचं लसीकरण कमी झाल्यास त्यांना संसर्ग झाल्यास मृत्यूची शक्यता अधिक असते. मात्र रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्या व्यक्तींचं जास्तीत जास्त संख्येनं लसीकरण केल्यास त्यांच्याही मृत्यूची शक्यता कमी होते.

हे वाचा - Explainer: पालकांनो लक्ष द्या! लहान-किशोरवयीन मुलांसाठी कोरोना लस सुरक्षित आहे?

त्यामुळे लसीकरणानंतर अँटीबॉडीज विकसित होतात की नाही याची पर्वा न करता, प्रत्येक व्यक्तीनं लस घेणं आवश्यक आहे.जितक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल, तितकी संसर्गाची आणि कोविडनं मृत्यूची शक्यता कमी होईल.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus