मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रोज केला ‘हा’ साधा उपाय तर चेहरा होईल सुंदर; फॉलो करा शहनाज हुसेन यांच्या टिप्स

रोज केला ‘हा’ साधा उपाय तर चेहरा होईल सुंदर; फॉलो करा शहनाज हुसेन यांच्या टिप्स

प्रसिद्ध ब्युटीशियन शहनाज हुसेन (Beautician Shahnaz Hussain) यांनी चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स (Easy Tips)सांगितल्या आहेत.

प्रसिद्ध ब्युटीशियन शहनाज हुसेन (Beautician Shahnaz Hussain) यांनी चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स (Easy Tips)सांगितल्या आहेत.

प्रसिद्ध ब्युटीशियन शहनाज हुसेन (Beautician Shahnaz Hussain) यांनी चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स (Easy Tips)सांगितल्या आहेत.

दिल्ली,14 जून : आपला चेहरा सुंदर, तजेलदार दिसावा असं प्रत्येक महिलेला वाटतं असतं. मात्र चेहऱ्यावरील पिंपल्स, वांगाचे डाग, डार्क सर्कल, सुरकुत्या यामुळे चेहरा निस्तेज (Dull skin) वाटायला लागतो. त्यामुळे चिंता सतावायला लागते मग वेगवेगळ्या क्रीम्स, फेस पॅक, होम रेमेडीज (Home Remedies) वापरायला सुरुवात होते. त्यामुळे चेहरा आणखीन डॅमेज (Skin Damage) होऊ शकतो. अशा वेळेस ब्युटी एक्सपर्टने दिलेल्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात. प्रसिद्ध ब्युटीशियन शहनाज हुसेन (Beautician Shahnaz Hussain) यांनी चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स (Easy Tips)सांगितल्या आहेत. शेहनाज हुसैन सांगतात चेहऱ्यावर पिंपल्स निघून गेल्या तरी, चेहऱ्यावर डाग पडतात. एकामागून एक पिंपल्स येत असतील तर, असे बरेच खड्डे चेहऱ्यावर तयार होतात आणि त्यामुळे चेहरा खराब दिसायला लागतो. सेन्सिटीव्ह स्किन (Sensitive skin) असलेल्या लोकांना उन्हामध्ये गेल्यानंतर चेहऱ्यावर लगेच परिणाम दिसतो. उन्हामुळे चेहऱ्यावर काळे डाग (Black spots) पडू लागतात. मात्र या त्रासावर काही साधे सोपे उपाय करता येऊ शकतात. स्क्रीन टाईप नुसार हे उपाय किती फायदेशीर ठरतील हे ठरतं. चेहऱ्यावर पिंपल येऊन गेल्यानंतर, त्या ठिकाणी खड्डा पडला असेल तर याचा अर्थ तिथले स्किन टिश्यु नष्ट झालेले असतात. तिथे नवीन त्वचा तयार होण्यासाठी वेळ लागतो. चेहऱ्यावर खड्डे दिसायला लागले तर, चेहरा जास्त वयस्क वाटायला लागतो. जास्त खड्डे पडल्याने त्वचा मुलायम पोत गमावून बसते. चेहऱ्यावरचे हे डाग घालवण्यासाठी अनेक थेरपी आता उपलब्ध आहेत. लेझर थेरपी, मायक्रो-डर्माब्रेशन, केमिकल पिलिंग सारखे उपाय करता येऊ शकतात.

पण,केमिकल पिलिंग हा चांगला उपाय असला तरी त्याचे काही साईड इफेक्ट देखील आहेत. त्यापेक्षा व्हेज पिलिंग फायदेशीर ठरू शकतं असं शहनाज हुसेन यांचं मत आहे. मुरूमांचे डाग कमी करण्यासाठीचं व्हेज पिल उपचार पद्धती तयार करण्यात आलेली आहे. ही डर्माब्रेशनवर आधारित क्लिनिकल ट्रीटमेंट आहे. जी झाडांच्या अर्कापासून तयार केली जाते. यासंदर्भात हर जिंदगीमध्ये माहिती देण्यात आली आहे.

(पैसों के लिए कुछ भी! तलावात दिसल्या 500 च्या नोटा, त्याचं झालं असं की...)

व्हेज पिलिंग ट्रीटमेंट

चेहऱ्यावरचे डाग कमी करायचे असतील त्यासाठी सर्वात आधी चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी व्हायला पाहिजेत. पिलिंग ट्रीटमेंट अतिशय सोपी आहे.  त्यामुळे पिलिंग ट्रीटमेंट होम केअर रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता. अनेक ब्रँडचे व्हेज पिल बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पिलमुळे चेहऱ्यावर पडलेले डाग कमी व्हायला लागतात. पण पिल ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर एक ते दीड महिन्यांमध्ये आपल्याला फरक जाणवू लागतो. जास्त डाग असतील तर यापेक्षा जास्त वेळही लागू शकतो.

चेहऱ्यासाठी स्क्रब

शहनाज हुसैन सांगतात चेहऱ्यासाठी काही घरगुती उपाय देखील करता येतात. घरच्या घरी एखादा स्क्रब तयार करता येऊ शकतो. याकरता तांदळाचं पीठ आणि दह्याचा वापर करता येतो. 1 चमचा तांदळाच्या पिठात 2 चमचे दही एकत्र करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर गोलाकार फिरवत हलक्या हाताने घासा. यामुळे चेहऱ्यावरचे डाग निघून जातील. ज्या ठिकाणी पिंपल्सचे डाग पडले आहेत त्या ठिकाणी जास्त वेळ मसाज करा. पाच मिनिटं तसंच राहू द्या त्यानंतर चेहरा धुवून टाका.

(काय सांगता! 'या' देशात राहते पावसाची राणी)

फेस मास्क

स्क्रब प्रमाणेच घरच्या घरी एखादा फेसपॅक देखील तयार करता येऊ शकतो. हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरता येऊ शकतो. 3 चमचे ओट्स, 1 एग व्हाईट,1 चमचा दही, 1 चमचा मध आणि शक्य असेल तर, 1 चमचा संत्र किंवा लिंबाच्या सालीची पावडर हे सगळे पदार्थ एकत्र करून सांगली पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. अर्धा तासानंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका.

ड्राय स्किनसाठी फेस पॅक

कोरड्या त्वचेसाठी देखील सोप्या पद्धतीन फेस पॅक बनवता येऊ शकतो. 2 चमचे दह्यात 1 चिमूट हळद घालून चांगली पेस्ट बनवा. 15 मिनिटं हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. याने चेहरा साफ होऊन चेहऱ्यावरचे डागही कमी होतील.

(पावसात भिजल्यानंतर फक्त डोकं नाही, कानही नीट स्वच्छ करा; नाहीतर बळावेल मोठा धोका)

फ्रूट फेस मास्क

चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी फ्रूट मास्कचा वापर करू शकता. पपईचा गर, किसलेली काकडी, टोमॅटोचा गर, संत्र्याचा रस एकत्र करा. फेस पॅक 20 मिनिटांसाठी चेहर्‍यावर लावा आणि चेहरा धुऊन टाका याच्या वापराने नक्कीच फायदा होईल. मात्र त्वचेवर जास्त प्रमाणात डाग असतील किंवा या पॅकने त्रास होत असेल तर, वापर बंद करा.

First published:
top videos

    Tags: Beauty tips, Home remedies, Skin, Skin care