• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • झटकेदार मिरची नको रे बाबा,म्हणत असाल तर हे वाचा फायदे; डायबेटिस असणाऱ्यांनी तर अवश्य खावी हिरवी मिरची

झटकेदार मिरची नको रे बाबा,म्हणत असाल तर हे वाचा फायदे; डायबेटिस असणाऱ्यांनी तर अवश्य खावी हिरवी मिरची

Health Benefits Of Green Chilli: हिरवी मिरची नको रे बाबा असं म्हणत आरोग्य जपण्याचा प्रयत्न करत असाल तर एकदा तिचे फायदे वाचा... हिरव्या मिरच्या नियमित खाल्यास मेटाबॉलिजम चांगलं राहतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 जुलै: छोटीशी हिरव्या मिरची (Green Chilly) भाजीची चव दुप्पट करते. कोशिंबीरी किंवा रायत्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून त्याची चव (Test)अनेक पटींनी वाढवली जाते. हिरवी मिरचीची खासियत तिची झणझणीत चव नाही. तर, तिच्यापासून मिळणारं पोषण(Nutrition)देखील महत्वाचं आहे. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin C) जास्त प्रमाणात आढळतं, यामुशे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत(Immunity Boost) होते. याशिवाय, हृदयरोगाचा धोकाही (Risk of Heart Disease) कमी होतो. चला जाणून घेऊन हिरव्या मिरच्या खाण्याच्या फायद्यांविषयी. मिरची शरीर निरोगी ठेवते. यात कॅलरी नसतात. हिरव्या मिरच्या नियमित खाल्ल्याने मेटाबॉलिजम सुधारतं.हिरव्या मिरच्यांमध्ये एन्टी-ऑक्सिडन्ट्स भरपूर असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हिरव्या मिरच्या खाल्याने प्रोस्टेट संबंधित आजार होण्याची शक्यता देखील कमी होते. हिरव्या मिरच्या खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित होतं आणि रक्ताभिसरण सहजतेने होतं. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. (असे ओळखा 'होम रेमेडीज' करताना होणारे Side Effects; टाळा त्वचेचं नुकसान) हिरव्या मिरच्यांमधील कॅप्सॅसिन नावाचा घटक असतो. यामुळे त्या तिखट वाटतात. त्या हायपॉथालेमस नावाच्या मेंदूच्या एका भागावर  परिणाम करुन शरीराचं तापमान कमी करतात. यामुळेच उष्ण ठिकाणी हिरव्या मिरच्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात. हिरव्या मिरच्यांमध्ये आढळणारे कॅप्सॅसीन रक्ताभिसरण संतुलित करतं, यामुळे सर्दी आणि सायनसच्या संसर्गाचा धोका कमी होतो. सर्दी असल्यास हिरवी मिरची खावी. (या देशात Vaccine घ्या आणि मिळवा रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, सोनं, महागडा फ्लॅट) हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरात वाढलेली उष्णता त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करतात. अल्सरचा त्रस्त असलेल्या लोकांना तिखट खाणं अवघड असतं. पण, हिरव्या मिरच्यांमुळे त्रास कमी होतो.व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन असल्याने हिरव्या मिरच्या डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. (फळ खाताना करू नका ‘या’ चुका; होतील पोटाचे विकार) हिरवी मिरची थंड आणि काळोख्या ठिकाणी ठेवावी. हवा आणि प्रकाशामुळे त्यातील जीवनसत्व नष्ट होतात. हिरवी मिरची रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करते. म्हणूनच, मधुमेह असलेल्या लोकांनी ताबडतोब आपल्या आहारात हिरव्या मिरच्यांचा समावेश करावा. (वर्किंग कपल्ससाठी एकत्र कुटुंबपद्धती ठरतेय वरदान; हे आहेत 4 फायदे) हिरव्या मिरच्यांमध्ये आयर्न जास्त प्रमाणात आढळतं. म्हणून हिरव्या खाल्ल्या  पाहिजेत. हिरव्या मिरच्याचे खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका कमी होतो.
  Published by:News18 Desk
  First published: