• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • Vaccine घ्या आणि मिळवा रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, सोनं, महागडा फ्लॅट; या देशात लसीकरणानंतर मिळतेय अशी ऑफर

Vaccine घ्या आणि मिळवा रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, सोनं, महागडा फ्लॅट; या देशात लसीकरणानंतर मिळतेय अशी ऑफर

हाँगकाँगने एक अभिनव शक्कल लढवली असून इथे लस घेणाऱ्या लोकांना चक्क कोट्यवधी रुपयांच्या वस्तूंची ऑफर देण्यात आली आहे. जगातील ही सर्वात महागडी ऑफर आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 28 जुलै: गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोना विषाणूने (Coronavirus Pandemic) थैमान घातलं आहे. लाखो लोकांचा मृत्यू झाला असून कोट्यवधी लोकांना कोविड-19 आजाराची लागण झाली आहे. हा साथीचा रोग टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस (Vaccine) आहे. लस उपलब्ध झाल्यानने सर्वांनाच दिलासा मिळाला असून, जगभरात सर्व देशांनी लसीकरण मोहीम (Vaccination Drive) राबवण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच या विषाणूच्या डेल्टा वेरिएंटमुळे (Delta Variant) अनेक देशांमध्ये पुन्हा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पुन्हा चिंता वाढू लागली असून, जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO- डब्ल्यूएचओ) लसीकरणावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. मात्र लशीबाबत गैरसमज असल्याने अनेक लोक लस घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. या उपाययोजनांमध्ये हाँगकाँगने (Hongkong) एक अभिनव शक्कल लढवली असून इथे लस घेणाऱ्या लोकांना चक्क कोट्यवधी रुपयांच्या वस्तूंची ऑफर देण्यात आली आहे. जगातील ही सर्वात महागडी ऑफर आहे. पण अशी ऑफर देणारा जगातला हा पहिला देश नाही. या आधी अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या देशांनीही लस घेण्यासाठी लोकांना आकर्षक ऑफर देऊ केली होती. लसीकरणासाठी हाँगकाँग सर्वांत महागड्या ऑफर्स देणारा देश - लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक देश वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. लोकांचं प्रबोधन करण्याबरोबर त्यांना आकर्षक बक्षिसांची ऑफर देऊन लस घेण्यास प्रोत्साहित केलं जात आहे. लस निर्मात्या कंपन्याही अशा ऑफर्स देत आहेत. अमेरिका (USA), ब्रिटन (Britain) आणि रशियानेही (Russia) अशा ऑफर्स दिल्या आहेत. अमेरिकेने लोकांना विनामूल्य बिअर आणि फ्लाइट तिकिटांवर सूट देण्याची ऑफर दिली आहे. या ऑफर्समुळे लोक लस घेण्यासाठी पुढे येत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. Google वर या 5 गोष्टी सर्वाधिक सर्च करतात पुरुष; रिसर्चमधून हैराण करणारा खुलासा अशा ऑफर्समध्ये हॉंगकॉंगनेही पुढाकार घेतला असून त्यांनी जगातील सर्वात महागड्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. लस घेणाऱ्या लोकांना हाँगकाँग सरकारने चक्क रोलेक्स वॉच (Rolex Watch), टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Car), सोन्याची बिस्किटं (Gold Bar) आणि 10 कोटींचा फ्लॅट (10 Crores Flat) बक्षीस म्हणून मिळवण्याची संधी दिली आहे. ही एक प्रकारची लॉटरी असून, लॉटरी प्रणालीद्वारे (Lottery System) विजेता घोषित केला जाणार आहे. कोरोना रुग्णांनो हलगर्जीपणा नको! 2 लक्षणांकडे दुर्लक्ष बेतेल जीवावर ऑफर्समुळे वाढला लसीकरणाचा वेग - हाँगकाँगच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. यापूर्वी ज्यांना लस घेण्याची भीती वाटत होती, असे लोकही ही ऑफर येताच लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. हाँगकाँगमध्ये आतापर्यंत 30 टक्के म्हणजे सुमारे 22.7 लाख लोकांचं लसीकरण झालं असून, ही ऑफर जाहीर केल्यानंतर गेल्या 10-15 दिवसात लसीकरणाचा वेग चांगलाच वाढल्याचं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
First published: