एखादी होम रेमेडी ट्राय करत असताना तिचा वाईट परिणाम चेहरा किंवा त्वचेवर होत असेल तर,त्याचे काही संकेत आपली त्वचा द्यायला लागते. त्या संकेतांकडे लगेच लक्ष द्यायला हवं.
स्किन ड्राय होणं,केसांना खाज सुटणं, पुरळ उठणं, जळजळ होऊन त्वचा खेचल्यासारखी वाटणं ही साईड इफेक्टची लक्षणं आहेत.तर,केसांवर घरगुती उपाय केल्यानंतर केस गळायला लागणं, तुटणं, खाज सुटणं ही लक्षणं दिसायला लागतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी होम रेमेडी केल्यानंतर तिचे त्वचेवर साईड इफेक्ट दिसत असतील तर ते साईड इफेक्ट बरे करण्यासाठी आणखी एक घरगुती उपाय करण्यापेक्षा थेट स्किन एक्सपर्टचा सल्ला घ्या.
स्किन एक्सपोर्टच्या मते होम रोमेडीज वापरल्या जातात. घरच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे फेस फॅक, हेअर पॅक लावले जातात ते फायदेशीर देखील असतात मात्र,हे पॅक कशा पद्धतीने लावावेत,किती वेळ लावावेत, आठवड्यातून किती वेळा लावावे याची कल्पना नसते.त्यामुळे कधीकधी साईड इफेक्ट देखील व्हायला लागतात.
सगळेच घरगुती उपाय करणे वाईट असतात असं आपण म्हणू शकत नाही.पण एखादा घरगुती उपाय चांगला आहे.म्हणून तो आपल्या मैत्रिणीच्या त्वचेवर किंवा केसांवर चांगला परिणाम देत असेल तरी आपल्या त्वचेचा पोताप्रमाणे वापरावा.
होम रेमेडीज वापरल्यामुळे आपल्याला निश्चितच फायदा मिळतो मात्र,त्याकरता घरातले पदार्थ वापरत असाल तर, त्यांच्या मिश्रणाने काय रिएक्शन होते याचीही कल्पना असायला हवी. कधीकधी 2 वेगवेगळे पदार्थ एकत्र झाल्यानंतर त्यांची केमिकल रिअक्शन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.
काही होम रेमेडीज फायदेशीर असल्या तरी देखील व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि कापराचा वापर यांचा साईड इफेक्ट त्वचा किंवा केसांवर होऊ शकतो. बेकिंग सोड्यामुळे त्वचा जळू शकते तर, कापूर कितीही चांगला असला तरी त्याचे मिश्रण देखील चेहऱ्यावर रिएक्शन देऊ शकतं.
घरगुती उपायांसाटी एसेन्शीय ऑईल वापरले जातात. ते त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतात. यांचा त्वरित परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो मात्र,एसेन्शीय ऑईल केव्हा लावावे,किती प्रमाणात लावावे याची योग्य माहिती असणं आवश्यक आहे.
काही होम रेमेडीज आठवड्यातून एकदा, पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा वापरण्याचा सल्ला दिलेला असतो मात्र, याची पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण दोन-तीन दिवसांनी करतो आणि दुष्परिणाम भोगतो.