• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • कोणत्याही उपचाराची गरज नाही; दुःख, निराशेतून बाहेर पडण्याचे सोपे मार्ग

कोणत्याही उपचाराची गरज नाही; दुःख, निराशेतून बाहेर पडण्याचे सोपे मार्ग

कोणत्याही दुःखातून बाहेर पडण्यासाठी सोप्या अशा थेरेपी.

  • Share this:
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : मानवी जीवनात अनेकदा सुख-दुःखाचे (Grief) प्रसंग येत असतात. सध्याचा काळ हा स्पर्धेचा समजला जातो. त्यामुळं जीवनातील प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यातून हाती कधी यश गवसतं तर कधी अपयश. अपयश मिळाल्यावर दुःख होणं साहजिक असतं (Therapy to healing grief). परंतु, हे दुःख (Sadness) इतकं जिव्हारी लागतं की त्यातून बाहेर पडणं अशक्य होतं. यामुळं तणाव आणि डिप्रेशनसारखे विकार जडण्याची शक्यता असते. तसेच यास्थितीत मानसिक आजार (Psychological Disease) होण्याचीही शक्यता बळावते. जसं जगात एकही माणूस नाही की त्याला दुःखाचा सामना करावा लागला आणि जगात असे एकही दुःख नाही की त्यावर काही उपाय नाही. दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी आज अनेक उपाय उपलब्ध आहेत. एखाद्या कामात तुम्हाला अपयश आल्यानं किंवा एखाद्या प्रसंगानं तुम्ही दुःखात असाल तर फार काळ दुःखी न राहता तुम्ही वेळीच सावरणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी अनेक थेरपीज (Therapies) उपलब्ध आहे. या थेरपींच्या मदतीनं तुम्ही तुमची मानसिकता पूर्ववत करून नव्या जोमानं पुन्हा कार्यरत होऊ शकता. हे वाचा - Depression मुळे त्रस्त आहात; तर 'या' पाच आयुर्वेदिक टिप्स करा फॉलो आर्ट थेरपी (Art Therapy) - ही दुःखी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या थेरपीतून तुम्हाला कलेकडं प्रेरित होण्यासाठी मदत होते. संबंधित व्यक्तीला पेटिंग करणं किंवा लिखाण करण्यास सांगितलं जातं. मनातील भावना व्यक्त होण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरतं. संबंधित व्यक्ती पेटिंग किंवा लिखाण सातत्यानं करू लागल्यास ती दुःख विसरून जाते. वॉकिंग थेरपी (Walking Therapy) - हा खरंतर व्यायामाचा एक प्रकार आहे. या थेरपीत संबंधित व्यक्तीला चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे चालणं सामान्य चालण्यासारखं नसतं. या थेरपीत तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात चालायला सांगितलं जातं. तसेच चालताना संबंधित व्यक्ती नेमकी कशामुळी दुःखी आहे हे ओळखून त्यावर त्याला उपाय शोधण्यास सांगितले जातात. काही व्यक्तींसाठी ही थेरपी फारच फायदेशीर ठरते. कारण चालताना त्यांना त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. हे वाचा - High Blood Pressure: रक्तदाबाची समस्या असेल तर खाऊ नका 'हे' पदार्थ, वाढेल मृत्यू लाफ्टर थेरपी (Laughter Therapy) - सकाळच्या वेळी घराच्या आसपास असलेल्या बागेत काही लोकांना तुम्ही लाफ्टर थेरपी (Laughter Therapy) करताना नक्कीच बघितलं असेल. लाफ्टर थेरपीमुळं शरीरात एंडोर्फिन हॉर्मोन रिलीज होतो. आनंदी राहण्यासाठी हा हॉर्मोन तुम्हाला मदत करतो. मात्र ही थेरपी ग्रुपमध्ये दिली जाते. कुकिंग थेरपी (Cooking Therapy) - तणाव आणि दुःखी मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी कुकिंग थेरपी (Cooking Therapy) अधिकच प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. काही लोकांना नवीन रेसिपीज बनवणं खूप आवडतं. यावेळी बहुतांश व्यक्ती आपला ताण, दुःख विसरून जातात आणि त्यांना हलकं वाटतं. हे वाचा - मुलांचा आत्मविश्वास 'या' गोष्टींमुळे होतो कमी या थेरपीजचा वापर करून दुःखाला दूर सारता येऊ शकतं. त्यामुळं तुम्ही दुःखात किंवा तणावात असाल तर तुमच्या आवडीची थेरपी निवडून सर्व प्रकारच्या मानसिक त्रासातून मुक्त होऊ शकता.
First published: