Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

High Blood Pressure: रक्तदाबाची समस्या असेल तर खाऊ नका 'हे' पदार्थ, वाढेल मृत्यूचा धोका

High Blood Pressure: रक्तदाबाची समस्या असेल तर खाऊ नका 'हे' पदार्थ, वाढेल मृत्यूचा धोका

उच्च रक्तदाबाच्या (Diet for high bp) समस्येमुळे हृदयविकाराचा धोकाही असतो. अशावेळी आपल्याला आपल्या आहारावर योग्य पद्धतीने लक्ष देऊन काम केले तर या आजारावर मात करता येते.

  • Published by:  Atik Shaikh

दिल्ली, 15 सप्टेंबर : उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्या ही आजच्या वयस्कर लोकांसह तरूणांनाही अडचणीची ठरू लागली आहे. त्यामुळे ते सातत्याने या आजाराचा सामना करत असताना याच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे जात असतात. उच्च रक्तदाबाच्या (Diet for high bp) समस्येमुळे ह्रदयविकाराचा धोकाही असतो. अशावेळी आपल्याला आपल्या आहारावर योग्य पद्धतीने लक्ष देऊन काम केले तर या आजारावर मात करता येते. त्यामुळे आपण आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून आणि काही गोष्टींचे पथ्य पाळून या आजाराने आपली मुक्तता करू शकतो. त्यामुळे आपण अशा काही पदार्थांची माहिती घेणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश केल्यास त्याचा मोठा धोका आपल्या आरोग्याला होण्याची शक्यता असते.

उच्च रक्तदाबाने त्रस्त असणाऱ्या रुग्णाला (bp patient) आपल्या आहारात मीठाच्या प्रमाणावर आणि त्याच्या वापरावर फार लक्ष द्यावे लागते. त्यावेळी आपल्याला आवश्यकतेनुसारच मीठाचे सेवन करावे लागते. कारण मीठाच्या अतिसेवनामुळे आपल्या रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि त्याचा विपरित परिणाम हा ह्रदयविकारावर होतो. त्यावेळी आपल्या शरिरातील रक्तप्रवाह हळू होतो. त्यामुळे आपल्याला मृत्यूचाही धोका वाढलेला असतो. त्यामुळे अतिरिक्त मीठाचे सेवन करणे टाळायला हवे.

Tea For Health : गार झालेला चहा पुन्हा गरम करून पिऊ नका; होऊ शकतात गंभीर परिणाम

त्याचबरोबर उच्च रक्तदाबाने ग्रस्त असणाऱ्या लोकांना दारूचे व्यसन असेल तर अशावेळी त्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. कारण दारूमुळे शरिरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात. ज्यामुळे त्याचा परिणाम हा शरिरातील रक्तप्रवाहावर होतो. त्यामुळेही मृत्यूचा धोका वाढण्याची शक्यता असते. आहारात जर उच्च रक्तदाबाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीने जास्त फॅट असलेले पदार्थ खाल्ले तर त्याचा थेट परिणाम हा त्याच्या शरिरातील ट्रायग्लिसरायड्स वाढण्यावर होतो. त्यामुळे पुन्हा त्याचा रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

(Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

First published:

Tags: Blood donation, Health Tips