Home /News /heatlh /

Depression वरही आहेत आयुर्वेदिक उपचार! या 5 टिप्स फॉलो करा आणि सुखी राहा

Depression वरही आहेत आयुर्वेदिक उपचार! या 5 टिप्स फॉलो करा आणि सुखी राहा

दररोजच्या धावपळीच्या आयुष्यामुळे, अपेक्षांच्या टेन्शनमुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात नैराश्याला (Depression) सामोरं जावं लागत आहे

    दिल्ली, 14 सप्टेंबर : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यामुळे आता तरुणांना मोठ्या प्रमाणात नैराश्याला (Depression) सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे लोकांना सततच्या तणापूर्ण आयुष्यात जगावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे आपल्या करिअरचं काय होणार किंवा इतरांचे आरोग्याचे प्रश्न अशा चिंतेमुळे (Tension) तरुणांना Depression चा सामना करावा लागत आहे. त्याचा विपरित परिणाम हा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही होत असून त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नकारात्मकतेचा भाव वाढत चालला आहे. अशातच आता नाराज होता आयुष्याच जगण्याची उमेद ठेऊन आयुर्वेदात (Ayurveda) सांगितलेल्या काही गोष्टींना आपण आपल्या आयुष्याचा फॉलो केले तर त्याचा फायदा हा आपल्याला आपल्या नाउमेद झालेल्या लाइफमध्ये होऊ शकतो. (Ayurvedic Tips That Will Help You Reduce Stress) त्यासाठी नेमकं काय करावं लागेल, हे आपण जाणून घेऊया. केळीच्या पानावर जेवण का करावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे तणाव कमी करण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या काही गोष्टी तणाव आपल्या आयुष्यातून कमी व्हावा, यासाठी सर्वात आधी आपल्या लाइफमधील काही कामं ही हळूहळू करा, म्हणजे आपल्या कामांतून थोडा ब्रेक घ्या. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. त्याचबरोबर आपल्याला मानसिकरीत्या शांतता तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या शरीराला आराम मिळेल. त्यामुळे कामातून काही वेळ काढल्यानंतर थोडा आराम करायला हवा. आपण दररोज जे काही अन्नपदार्थ खात आहोत, ते हेल्दी असायला हवे. जेणेकरून आपण जेव्हा तणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला शरीराची साथ असायला हवी.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Health Tips, Mental health, Stress

    पुढील बातम्या