Home /News /lifestyle /

Self Confidence : मुलांचा आत्मविश्वास 'या' गोष्टींमुळे होतो कमी; कसा द्यायचा मानसिक सपोर्ट?

Self Confidence : मुलांचा आत्मविश्वास 'या' गोष्टींमुळे होतो कमी; कसा द्यायचा मानसिक सपोर्ट?

अनेकदा पालक हे आपल्या मुलांमधील काही गोष्टीच्या सुधारणा करण्यासाठी त्यांची तुलना इतर मुलांशी करायला सुरुवात करतात.

    दिल्ली, 15 सप्टेंबर : आपल्या घरातील लहान मुले हे अतिशय चतुर आणि बुद्धिमान (child Talent) असतात. सातत्याने ते घरकामात अथवा शाळेतील शिक्षणामध्ये (Child Education) दाखवून देतात. त्यामुळे आपल्याला त्याच्या अशा हुशारीचा फार अभिमान वाटत असतो. कारण एवढ्या कमी वयात ते मोठी कामगिरी बजावत असल्याने आपल्याला त्याचा आनंद होत असतो. परंतु कधी कधी ही लहान मुलं हुशार असतानादेखील ते काही कारणांमुळे आपला आत्मविश्वास (Self Confidence In Kids) हरवून बसतात. त्यामुळे या गोष्टीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. आपली गुणवत्ता ते हरवून बसतात. अशामुळे लहान मुलांनाही नैराश्यग्रस्त (Self-confidence) आयुष्याचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे आपण आपल्या घरातील लहान मुलांच्या (Childhood) मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्याल आणि त्याना कसं मानसिकरित्या कसं स्टेबल कराल याविषयी आपण काही माहिती घेऊयात. अनेकदा पालक हे आपल्या मुलांमधील काही गोष्टीच्या सुधारणा करण्यासाठी त्यांची तुलना इतर मुलांशी करायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यातून पालक हे आपल्या पाल्याचे मानसिकरीत्या खच्चीकरण करत असतात. आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना करणं हे त्या मुलाला त्याच्या स्वत:विषयी न्यूनगंडाची भावना तयार करते. त्यामुळे त्याच्या अशा गोष्टींवरून त्याला त्याचे सोबती मित्र चिडवतात. त्यामुळे तो आत्मविश्वास गमावून बसतो. Bad Habits For Health: तुम्हाला 'या' वाईट सवयी असतील आरोग्याला आहे मोठा धोका आपल्या पाल्याने कुठलीही चूक केली असेल तर त्याची खिल्ली उडवू नये, त्यासाठी त्याला काही गोष्टी समजजावून सांगायला हव्यात, जेणेकरून त्याच्याकडून ती चुक पुन्हा घडणार नाही आणि तो निराशही होणार नाही. त्याला आपण काही तरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल. छोट्या छोट्या गोष्टीवरून कधीकधी पालक हे आपल्या पाल्याला मारहाण करतात. ती मारहाण त्यांच्या मानसिक आरोग्यावर आघात करण्याची शक्यता असते. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Childhood struggle, Health Tips, Mental health

    पुढील बातम्या