मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सुंदर पिचाई स्वत:ला कसं ठेवतात तणावमुक्त? जमिनीवर झोपून करतात हे काम, तुम्हीही करुन पाहा

सुंदर पिचाई स्वत:ला कसं ठेवतात तणावमुक्त? जमिनीवर झोपून करतात हे काम, तुम्हीही करुन पाहा

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई एका वेगळ्याच ट्रिकद्वारे स्वत:ला तणावमुक्त ठेवतात. सुंदर पिचाई स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी NSDR अर्थात Non Sleep Deep Rest चा टेक्निक वापरतात.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई एका वेगळ्याच ट्रिकद्वारे स्वत:ला तणावमुक्त ठेवतात. सुंदर पिचाई स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी NSDR अर्थात Non Sleep Deep Rest चा टेक्निक वापरतात.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई एका वेगळ्याच ट्रिकद्वारे स्वत:ला तणावमुक्त ठेवतात. सुंदर पिचाई स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी NSDR अर्थात Non Sleep Deep Rest चा टेक्निक वापरतात.

नवी दिल्ली, 13 मार्च : सध्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण शांततेच्या, तणावमुक्त जगण्याच्या शोधात असतो. तणावमुक्त राहण्यासाठी पॉवर नॅप, संगीत, मेडिटेशन, योगा असे विविध उपायही केले जातात. पण गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) एका वेगळ्याच ट्रिकद्वारे स्वत:ला तणावमुक्त ठेवतात.

सुंदर पिचाई स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी NSDR अर्थात Non Sleep Deep Rest चा टेक्निक वापरतात. यात व्यक्ती झोपल्याशिवाय स्वत:ला चांगल्या आरामाद्वारे तणावमुक्त ठेवतो. सुंदर पिचाई यांनी वॉल स्ट्रिट जनरलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये NSDR अतिशय फायदेशीर असल्याचं सांगितलं. एका पॉडकास्टद्वारे त्यांना ही माहिती मिळाल्याचंही ते म्हणाले.

काय आहे NSDR -

स्टॅनफोर्ड न्यूरोसायन्सचे प्रोफेसर एंड्यू ह्यूबरमॅन यांनी NSDR जगात आणण्याचा दावा केला आहे. NSDR प्रोसेसमध्ये व्यक्ती डोळे बंद करुन जमिनीवर झोपतो. त्यानंतर एखादी गोष्ट आठवून त्यावर लक्षकेंद्रीत करण्याचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेत जसा मेंदू आराम अवस्थेत जातो तसं हृदयाचे ठोके हळू-हळू होत जातात. यात व्यक्तीचा मेंदू बीटा लहरींकडून अल्फा लहरींकडे वळतो. बीटा लहरी सक्रिय मेंदूशी जोडलेल्या असतात. तर शांत अवस्थेत अल्फा लहरी अधिक सक्रीय असतात.

हे वाचा - आपल्या या चुकीच्या सवयींमुळं हाडं होतात कमकुवत; आजपासूनच करा बदल

काय आहेत फायदे -

- NSDR लोकांना कमी वेळेत आराम करण्यात मदत करतं.

- यामुळे झोपण्यास, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी, दुखणं कमी करण्यास मदत मिळते.

- तसंच शिकण्याची क्षमताही वाढण्यास मदत होते.

हे वाचा - brain function: या 4 कारणांमुळं आपला मेंदू कधीही काम करण्याचा बंद होऊ शकतो

कसं करता येईल NSDR -

- या प्रक्रियेत पाठीवर झोपून डोळे बंद करावेत.

- आता एखादी गोष्ट आठवा आणि त्यावर लक्षकेंद्रीत करा.

- श्वासावरही लक्षकेंद्रीत करा.

- लांब श्वास घेत शरीर हलकं ठेवण्याचा प्रयत्न करा.

First published:

Tags: Google, Sundar Pichai, Tech news