मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Healthy Bones: आपल्या या चुकीच्या सवयींमुळं हाडं होतात कमकुवत; आजपासूनच करा बदल

Healthy Bones: आपल्या या चुकीच्या सवयींमुळं हाडं होतात कमकुवत; आजपासूनच करा बदल

Tips For Healthy Bones: वाढत्या वयाबरोबर हाडांना इजा होण्याची किंवा हाड मोडण्याची भीतीही वाढते. अनेक वेळा आपल्या खाण्या-पिण्यात किंवा जीवनशैलीत झालेल्या चुकांमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात.

    नवी दिल्ली, 12 मार्च : जसजसं वय वाढत जातं तसतसं आपल्या शरीरातील हाडे (Bones) कमकुवत होत जातात आणि त्यांची घनताही कमी होत जाते. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर हाडांना इजा होण्याची किंवा हाड मोडण्याची भीतीही वाढते. अनेक वेळा आपल्या खाण्या-पिण्यात किंवा जीवनशैलीत झालेल्या चुकांमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. वेगवेगळी औषधं वापरूनही हाडे कमकुवत होत राहतात. वेबएमडीच्या माहितीनुसार, आपण एकाच जागी तासनतास बसून राहिल्यास किंवा खाण्यापिण्यात जास्त मीठ खाल्ल्यास या सवयींमुळे आपल्या हाडांचेही खूप नुकसान होते. आपण वेळीच वाईट सवयी (Bad Habits) बदलून वृद्धापकाळापर्यंतही हाडे मजबूत ठेवू (Tips For Healthy Bones) शकतो. हाडे कमकुवत होण्याची कारणं जास्त मीठ खाणं जास्त मीठ खाल्ल्यास हाडांची घनता कमी होऊ शकते. मीठामध्ये सोडियम असते ज्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होते. त्यामुळे जेवणात मीठ कमी वापरावं. सूर्यप्रकाशात न जाणं अनेक लोक दिवसभरात घर, ऑफिस, कामाच्या ठिकाणी असतात. त्यामुळे सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडत नाही. यामुळंही आपली हाडं कमकुवत होऊ शकतात. वास्तविक सूर्यापासून मिळणारे व्हिटॅमिन डी मजबूत हाडांसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी सूर्यप्रकाशात जाणंही गरजेचं आहे. एका जागी बैठे काम शरीर सक्रिय राहणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही अनेक तास एकाच जागी बसून राहिल्यानं शरीराची हालचाल केली नाही तर तुमची हाडे हळूहळू कमकुवत होऊ लागतात. हे वाचा - निरोगी राहण्यासाठी फॉलिक अ‌ॅसिडची शरीराला गरज; या गोष्टींचा करा आहारात समावेश दुचाकीचा जास्त वापर अगदी कमी अंतरासाठीही तुम्ही बाईक वापरत असाल तर त्यामुळे तुमचं चालणं जवळपास काहीच होत नाही. त्याचाही आपल्या हाडांवर परिणाम होतो. जवळच्या अंतरासाठी सायकलचा वापर करणं फायदेशीर आहे. जास्त सोडा वापरणं जर तुम्ही कोला किंवा सोडा जास्त पित असाल तर त्यात असलेले कॅफिन, फॉस्फरस हाडे कमकुवत करण्याचे काम करतात. यामुळे कॅल्शियमचे शोषण कमी होतं. हे वाचा - स्कीन आणि केसांसाठी कापूर तेल कधी वापरलंय का? घरीच अशा पद्धतीनं बनवू शकता धुम्रपान करणं धूम्रपान केल्यानं तुमची फुफ्फुसं तर कमकुवत होतातच पण हाडांवरही त्याचा परिणाम होतो. कमी झोप रात्रभर पुरेशी झोप न मिळाल्याने किंवा रात्रभर टीव्ही किंवा लॅपटॉप पाहिल्यानं त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Healthy bones

    पुढील बातम्या