Home /News /lifestyle /

Ganesh chaturthi : गणेशपूजेत का वाहिल्या जातात 21 पत्री? फक्त धार्मिक नाही यामागे आहे वैज्ञानिक कारण

Ganesh chaturthi : गणेशपूजेत का वाहिल्या जातात 21 पत्री? फक्त धार्मिक नाही यामागे आहे वैज्ञानिक कारण

Ganesh chaturthi : गणेशपूजनात (Ganesh pujan) वापरल्या जाणाऱ्या पानांचं (Leaves to worship ganesh) महत्त्व माहिती आहे का?

    मुंबई, 08 सप्टेंबर : काही दिवसांत गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) आहे. बाप्पा विराजमान होती (Ganesh festival). त्यावेळी गणेशपूजन (Ganesh pujan) केली जाईल. गणेशपूजनात 21 प्रकारच्या पत्री (21 Patra for ganesh puja) वाहिल्या जातात. त्यामागे फक्त धार्मिक नव्हे तर शास्त्रीय कारणही आहे. या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मानवाच्या सभोवताली असणार्‍या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू. हजारो वर्षांच्या निरीक्षण आणि संशोधनानंतर मिळालेलं औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायास मिळावं हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहण्यामागे आहे. गणेशपूजनात ज्या 21 प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात त्या कोणत्या आणि त्याचं वैज्ञानिक किंवा शास्त्रीय महत्त्वं काय आहे. त्याचा आरोग्याला कसा फायदा होतो ते पाहुयात. 1) अगस्ती किंवा हादगा (Sesbania Grandiflors) अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने. प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये 45000 यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असतं. 2) अर्जुन (Terminallia Arjuna) अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच.  आयुर्वेदानुसार अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणार्‍या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात. 3) आघाडा किंवा अपामार्ग (Achyranthus Aspera) आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे महिलांच्या समस्येवर आहेत. स्त्रीरोगांवर विशेष असं उपयुक्त आहे. 4) कण्हेर (Nerium Odorum) कण्हेर किंवा करवीर ज्याचा उपयोग तारतम्याने करतात. कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय आणि श्वसनक्रिया बंद पडून आकडी येते. 5) केवडा (PendenusTectoritus) केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेलं तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो. हे वाचा - हरितालिका व्रतादिवशी येतोय हा दुर्मिळ योग, कशी कराल ही महत्त्वाची पूजा? 6) जातिपत्र (Jasminum Oriculatum) जातिपत्रे अर्थात जाईची पाने. जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुवून, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते. 7) दाडिमपत्रे (Punica Granatum). अर्थात डाळिंबाची पाने चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे. विशेषत टेपवर्मचा (चपटे कृमी) त्रास याने नाहीसा होतो. लहान मुलांना होणार्‍या जंत, जुलाब यासारख्या आजारांमध्ये डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे. दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण अशी काही औषधंही उपलब्धही आहे. 8) बृहतीपत्रे (Solanum Indicum) बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने. डोरलीसारखे रूप असणार्‍या रिंगणीच्या फळांचा आणि बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते. 9) तुळसीपत्र (Ocimum Sanctum) तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो. 10) दूर्वांकुर (Cynodon Dectylon) गणपतीला दुर्वा प्रिय आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे. हे वाचा - गणेशोत्सावासाठी गुरुजी मिळणं झालं कठीण? स्वत:च करा प्राणप्रतिष्ठा 11) देवदार (Pinus Deodora) चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असंसुद्धा म्हटलं जातं. 12) धत्तुरपत्र (Datura Stramonium)  धत्तुरपत्र म्हणजे धोत्र्याची पानं. हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो, अन्यथा घातक ठरू शकतो. 13) अश्वत्थपत्रे पिंपळपान (Phycus Religiosa) अश्वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने. पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे, ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे. 14) बेलपत्र (Aegle Marmelos) बेलाची पाने, बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा ही काही बेलाची तयार औषधं आहेत. 15) बदरीपत्र (Zizyphus Vulgaris) बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने. बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी आरोग्यासाठी उत्तम. बोराच्या पानांची चटणी तांदळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो. हे वाचा - गणेश चतुर्थीचं हे महत्त्व माहीत आहे का? प्रतिष्ठापना का, कशी आणि कधी करावी? 16) मरुपत्र (Origanum Margorana) मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने. मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणार्‍या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणार्‍या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असं आयुर्वेद सांगतं. 17) मधुमालती (Jasminum Grandiflorum) मधुमालती म्हणजे मालती. प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे. 18) भृंगराजपत्री (Eclipta Alba) भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने. माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्हीसाठी तो उपयोगी ठरतो. 19) अर्कपत्रे (Calotropis procera) अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचं कार्य सुधारणारं आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असं हे औषध आहे. 20) विष्णुक्रान्ता (Evolvulus Alsinoides) विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी. बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले विघ्न दूर करते. हे वाचा - तुम्हालाही बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा प्रश्न असेल तर, करा हे सोपे पदार्थ 21) शमीपत्र (Prosopis Spicigera) शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी. त्यावरून शमीची पाने आरोग्यासाठी किती उत्तम आहेत, हे समजतं. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही.)
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Culture and tradition, Festival, Ganesh chaturthi

    पुढील बातम्या