मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Ganesh Chaturthi 2021: तुम्हालाही बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा प्रश्न असेल तर, करा हे सोपे पदार्थ: video

Ganesh Chaturthi 2021: तुम्हालाही बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा प्रश्न असेल तर, करा हे सोपे पदार्थ: video

गणेशोत्सवाच्या काळात हे सोपे पदार्थ नैवेद्यासाठी फारच उत्तम आणि पौष्टिक आहेत आणि बाप्पाचे आवडते आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात हे सोपे पदार्थ नैवेद्यासाठी फारच उत्तम आणि पौष्टिक आहेत आणि बाप्पाचे आवडते आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात हे सोपे पदार्थ नैवेद्यासाठी फारच उत्तम आणि पौष्टिक आहेत आणि बाप्पाचे आवडते आहेत.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 4 सप्टेंबर : गणपतीसाठी घरी आल्यावर त्यांच्यासाठी रोज आरती झाल्यावर नैवेद्य दाखवला जातो. तसंतर आपण गणेसोत्सव काळात घरात जे पदार्थ तयार करतो ते बाप्पाला अर्पण करतो. पण, गणेशाला रोज आरती झाल्यावर गणरायासाठी नैवेद्य दाखवून प्रसाद देण्याची पद्धत असते. पण, 10 दिवस गणेशाला कोणता प्रसाद अर्पण करायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, घरातले काही पदार्थ सुद्धा वापरून सोपा प्रसाद म्हणून करू शकता.

सुकामेवा

आपल्या घरात सुकामेवा असतोच. हाच सुकामेवा प्रसाद म्हणून गणपतीला अर्पण करता येतो. मनुका, बदाम, काजू, बेदाणे, अक्रोड, पिस्ता, अंजीर एकत्र करून देवाला आरती झाल्यावर अर्पण करा. हा प्रसाद पौष्टीकही आहे.

(आजही पृथ्वीवर आहे कृष्णाचं हृदय; हैराण करणारं हे रहस्य माहिती आहे का?)

पंचखाद्य

गणपतीच्या बाप्पाच्या पुजेत पंचखाद्यचं विशेष महत्त्व आहे. त्यासाठी खारीक थोडीशी परतून घ्या. त्यानंतर किसलेलं खोबरं, थोडं गुलाबी होईपर्यंत भाजा. त्यानंतर खसखस भाजा. मग, खवा रंग बदलेपर्यंत परतून घ्यावा. खव्याऐवजी गव्हाचं पिठ तुपावर परतूनही घेता येतं. आता खसखस वेगवेळी वाटून घ्या. त्यात खारी घाला. खारीक बारीक झाली की, खोबर घालून वाटा.

" isDesktop="true" id="599006" >

त्याच मिक्सच्या भांड्यात खडीसाखर बारीक करा. थंड झालेला खवा घाला. त्यानंतर त्यात खडीसाखरेचे तुकडे घाला. झाला पंचखाद्याचा नैवेद्य तयार.

(नवीन कपडे खरेदी केलेत? परिधान करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी)

सुंठवडा

खारीक थोडी भाजा, त्यानंतर बदाम मग काजू, एक चमचा बडीशेप, एक चमचा तीळ, एकचमचा खसखस आणि वेलची भाजा, अर्धीवाटी सुकं खोबरं गुलाबी होईपर्यंत भाजा, आता सगळ्या वस्तू मिक्सरमध्ये वाटा.

" isDesktop="true" id="599006" >

त्यात आवश्यकतेनुसार खडीसाखर आणि साखर घालून वाटा. यामध्ये 2 चमचा सुंठ पावडर घालून वाटा म्हणजे सगळं एकजीव होईल. त्यानंतर सुकं खोबर हाताने चुरून घाला.

(देवघरातील पितळी मूर्ती काळ्या पडल्यात? या घरगुती उपायांनी होतील चमकदार)

याशिवाय घरात गुळ आणि खोबरं असतंच त्याचही मिश्रण प्रसादासाठी चालेल किंवा वेळेवर काहीचं उपलब्ध नसेल तर, खडी साखरेचा नैवेद्यही बाप्पाला चालतो. शेवटी आपली श्रद्धा महत्वाची.

First published:

Tags: Culture and tradition, Food, Ganesh chaturthi