मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थीचं हे महत्त्व माहीत आहे का? प्रतिष्ठापना का, कशी आणि कधी करावी?

Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थीचं हे महत्त्व माहीत आहे का? प्रतिष्ठापना का, कशी आणि कधी करावी?

Ganesh Chaturthi 2021:  भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशाची जन्मकथा आणि प्रतिष्ठापना, पूजा कशी, कधी करावी याविषयी सर्व काही...

Ganesh Chaturthi 2021: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशाची जन्मकथा आणि प्रतिष्ठापना, पूजा कशी, कधी करावी याविषयी सर्व काही...

Ganesh Chaturthi 2021: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशाची जन्मकथा आणि प्रतिष्ठापना, पूजा कशी, कधी करावी याविषयी सर्व काही...

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : आराध्य देवता बुद्धीचा कारक गणेशाचा जन्मोत्सव म्हणजे गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) देशात उत्साहात साजरी केली जाते. पूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रात (Maharashtra) गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. गणेशोत्सावाच्या 11 दिवसांच्या काळात एक आनंदाचं आणि भक्तीमय वातावरण असतं. या वर्षी 10 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. महाराष्ट्राबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते.

महाराष्ट्रात 10 दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवाची अनुभूती घेण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. रस्त्यावर-चौकाचौकात, गणेश मंडप सजवले जातात. तर दुसरीकडे गणेशभक्त आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात. 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप दिला जातो. काही लोक गणेशोत्सव 2 दिवस साजरा करतात, तर काही लोक पूर्ण 10 दिवस या उत्सवाचा आनंद घेतात. तर, घरगुती गणपतींचं गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जन केलं जातं.

(देवघरातील पितळी मूर्ती काळ्या पडल्यात? या घरगुती उपायांनी होतील चमकदार)

गणेश चतुर्थीचा इतिहास

शिव पुराणानुसार पार्वतीने तिच्या मळातून एक पुतळा तयार केला आणि त्याला जिवंत केलं असं सांगितलं जातं. या जीवंत झालेल्या मुलाला महालाच्या व्दारावर रक्षणासाठी ठेऊन ती आंघोळीला जाते. कोणालाही महालात प्रवेश करू देऊ नको असं तिने त्याला सांगितलेलं असतं. योगायोगाने शंकर देवाच आगमन त्याच वेळी तिथे होतं. त्यांना आत जाताना पाहून गणेश त्यांना दरवाज्यात अडवतो. देवाधीदेव महादेव बाळ गणेशाला खूप समजावतात पण, तो ऐकत नाही.

(फक्त फळं खाल्ल्यानेही होतं युरिक ॲसिड कमी; पाहा काय खावं काय टाळावं)

त्यांनतर रागाच्या भरात भगवान शिव त्रिशूळाने बाळ गणेशाचं डोकं उडवतात. अंघोळीवरून परतल्यावर देवी पार्वतीला जेव्हा हे कळतं तेव्हा ती खूप चिडते. तिचा क्रोध दूर करण्यासाठी भोलेनाथन हत्तीचं डोकं गणेशाच्या धडावर लावतात.

(तुम्हालाही आवडतं का असं दूध? बॅक्टेरियामुळे होतील घातक आजार)

गणेश चतुर्थीचं महत्त्व

गणेशाचं एक नाव विघ्नहर्ता देखील आहे. असं म्हणतात की, जो गणपतीची मनापासून पूजा करतो त्याच्या आयुष्यातलं सगळे विघ्न गणपती दूर करतो. गणपतीची पूजा केल्याने जीवनात सुख,शांती आणि समृद्धी येते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावं. देवघर स्वच्छ करावं. गणेशाच्या मुर्तीला स्नान घालावं. जास्वदाचं फुल, दुर्वा अर्पण कराव्यात. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मनोभावे गणपतीची आरती करावी.

First published:

Tags: Culture and tradition, Ganesh chaturthi, Lifestyle