• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • गणेशोत्सावासाठी गुरुजी मिळणं झालं कठीण? स्वत:च करा प्राणप्रतिष्ठा

गणेशोत्सावासाठी गुरुजी मिळणं झालं कठीण? स्वत:च करा प्राणप्रतिष्ठा

गणपतीच्या दिवशी (Ganesh Chaturthi) पुजारी मिळणं फार कठीण असतं त्यामुळे आत्ता पासूनचं त्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. पण, ऐनवेळी गुरूजी मिळालेच नाहीत तर काय कराल?...

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 ऑगस्ट :  कोरोना काळात (Corona Period) शहारातून गावी परतेल्या पुजाऱ्यांमुळे गणेशोत्सवाच्या काळात (Ganesh Chaturthi) गणपतीच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी आत्तापासूनच पुजाऱ्यांचं बुकिंग (Advance Booking) सुरू झालं आहे. शहरी भागात सध्या फार कमी पुजारी आहेत त्यामुळे गणेश चतुर्थीला पुजारी मिळणार नाहीत या भीतीने लोक आधापासूनच पुजारी ठरवून घेत आहेत. तर, सणांच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता गेल्यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आल्यामुळे या वर्षी मंडळांची संख्या थोडी वाढली आहे. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली गणेशोत्सव मंडळं आणि घटलेली पुजाऱ्यांची संख्या यामुळे सप्टेंबर महिना सुरू होण्याआधीच पुजारी ठरवून घेतलं जात आहेत. 10 सप्टेंबरला तर, पुजाऱ्यांची डिमांड वाढणार आहे. आतातर, कोरोनामुळे काही पुजाऱ्यांनी घरुनच व्हीडिओ कॉलिंगच्या (Video Calling) माध्यमातून पूजाविधी सांगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही बुकिंग सुरू आहे. (फक्त फळं खाल्ल्यानेही होतं युरिक ॲसिड कमी; पाहा काय खावं काय टाळावं) पुजारी मिळणं कठीण झालं असेल तर, युट्युबच्या माध्यमातूनही घरी आपणंच प्रतिष्ठापना करू शकतो. युट्युबवर पाहा पूजाविधी आता लोक टेक्नोसॅव्ही झालेले आहेत. साध्यातल्या साध्या गोष्टींसाठी इंटनेटचा वापर करतो. तसाच वापर आता पुजाविधी पाहण्यासाठी युट्यूबचा केला जात आहे. त्यावर अगदी साहित्य, मंत्रोच्चार, पुजा पद्धतीही एका क्लिकवर माहिती मिळू शकते. (देवघरातील पितळी मूर्ती काळ्या पडल्यात? या घरगुती उपायांनी होतील चमकदार) आजच्या काळात मोबाईल आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे आणि सर्च करणं सोपं झालं आहे. युट्यूबवर तर, रेसिपी, धार्मिक स्थळं, ज्योतिष शास्त्र सगळ्याचेचं व्हीडिओ मिळतात. तसच तिथे गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची स्थापना करण्याचा विधी सांगणारेही व्हीडिओ आहेत. शिवाय आरती, भजन, मंत्रोच्चारही युटयूबवर मिळतात. पुण्यात महिला पुरोहित सांगतात प्राणप्रतिष्ठापना पूजा मुंबईमध्ये पुजाऱ्यांची कमी असताना पुण्यात एक चांगली सुरुवात झाली आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ प्रमाणे त्यांनी या अडचणींवरही मात केली आहे. तिथे आता महिला पुजारीही पुजाविधी करतात. त्यामुळे पुण्यात आता पुरुष पडिंतासाठी महिला पंडित हा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पुण्यातून मुंबईत रहायला आलेल्या महिला आता पतीप्रमाणे पुजाविधी करत आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पुजेसाठी हाही पर्याय उपलब्ध आहे.
  Published by:News18 Desk
  First published: