स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 17 मे: दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे इडली होय. महाराष्ट्रातील लोकांनाही या पांढऱ्या शुभ्र आणि मऊ लुसलुशीत इडलीनं भुरळ घातलीय. प्रत्येक शहरात एखादा फेमस इडलीवाला असतोच. तसाच सांगलीतही एक प्रसिद्ध इडलीवाला असून त्याच्या इडली बनवण्याची दखल थेट उद्योगपती आनंद महिंद्रांनी घेतली. त्यांनी आपल्या ट्विटरवरून तिमाप्पा लिंगाप्पा शेट्टी हे इडली बनवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. विशेष म्हणजे इडली किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेट्टींच्या फॅक्ट्रीत दिवसाला 35 ते 40 हजार इडली तयार होतात. कर्नाटकचे शेट्टी सांगलीत तिमाप्पा लिंगाप्पा शेट्टी यांचं मुळ गाव कर्नाटकात आहे. 30 वर्षांपूर्वी मंगलोर जिल्ह्यातील बैतंगडी येथून ते कामासाठी सांगलीत आले. तेव्हा त्यांना मराठी, हिंदी या भाषांचा गंध देखील नव्हता. त्यांची मातृभाषा असलेली कन्नड ही एकमेव भाषा त्यांना बोलता येत होती. त्यात शिक्षणही नसल्याने ते सांगलीतील एका हॉटेलमध्ये कामाला लागले. हळूहळू त्याच कामात त्यांचा चांगला हात बसला. काही वर्षांनी त्यांनी जोडधंदा म्हणून इडल्या करून विकण्याचा निर्णय घेतला.
इडलीची फॅक्ट्री शक्ती केटरर्स तिमाप्पा यांनी सांगलीत इडली बनवून विकण्यास सुरुवात केली. सुरुवातील दिवसारा 25-30 इडल्या विकल्या जात होत्या. पुढं हा व्यवसाय वाढत गेला तिमाप्पांच्या इडल्यांना मागणी वाढली. त्यांनी शक्ती केटरर्स नावानं व्यवसाय सुरू केला. 25-30 इडलीपासून सुरू झालेला प्रवास 35 ते 40 हजार इडलीपर्यंत पोहोचला. कशी बनते इडली? या इडल्या बनवण्यासाठी याठिकाणी दररोज 3 क्विंटल तांदूळ आणि एक क्विंटल उडीद डाळ वापरली जाते. त्यासाठी ते अगोदर 8 तास भिजत घालून त्याचे व्यवस्थित वाटण करतात. ते पुन्हा 6 ते 8 तासासाठी भिजत घातले जाते. त्यानंतर ते पुन्हा एकजीव करून ते वाटण इडलीच्या नॉनस्टिक साच्यांमध्ये व्यवस्थित भरून मग ते सगळे मोठ्या स्टीमरमध्ये शिजवायला ठेवले जाते. ही सगळी प्रक्रिया मशीनवर केली जाते. हे फळ अनेक आजार दूर करतं, मात्र अवघे 2 महिने मिळतं बाजारात एकावेळी हजारो इडली तयार स्टीमरखाली मोठमोठ्या गॅसचे बर्नर्स लावलेले आहेत. ज्याच्या वाफेवर साधारणपणे अर्ध्या तासात या इडल्या व्यवस्थित शिजतात. त्यावर बोट ठेवून त्या कोरड्या झाल्या आहेत का हे चेक करून पाहिले जाते. अशाप्रकारे या मऊ, स्पंजसारख्या इडल्या तयार होतात. विशेष म्हणजे एका वेळी हजारो इडल्या या ठिकाणी तयार केल्या जातात. कशी बनते चटणी? तिमाप्प यांची इडलीसोबत खाल्ली जाणारी चटणीही सर्वांना आवडते. भरपूर खोबरे , फुटाण्याची डाळ , थोड्या मिरच्या, आले, चवीपुरते मीठ आणि गुळाचा एक छोटा खडा हे सर्व जिन्नस एकत्र करून मशीनमध्ये वाटून त्याची चटणी बनवली जाते. तिमाप्पा यांची ही इडली चटणी अनेक सांगलीकरांची अगदी फेव्हरेट डिश आहे. घरगुती कार्यक्रम, हॉटेलकडूनही मागणी तिमाप्पा यांनी तयार केलेली इडली सांगली, कोल्हापूर, आष्टा, इस्लामपूर परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये होलसेल दराने पुरवली जाते. तसेच घरातील छोटे मोठे समारंभ, वाढदिवस, भिशीच्या पार्ट्या, अचानक घरी आलेले पाहुणे या सर्ववेळी तिमाप्पा यांची इडली चटणी गृहिणींच्या मदतीला धावून येते. येथे आता इडली चटणी सोबतच विविध पदार्थांची सुविधा उपलब्ध केली आहे. येथे उदीडवडे, समोसे, बटाटेवडे, ढोकळा, दही वडा आदी पदार्थ होलसेल दरात उपलब्ध करून दिले जातात. सांगलीच्या पैलवानाची शाही थंडाई पोहोचली दुबईत! पाहा कसा झाला प्रवास, Video आनंद महिंद्रांना भुरळ काही दिवसांपूर्वी महिंद्रा मोटर्सचे मालक आनंद महिंद्रा यांनी एक व्यक्ती इडली बनवतानाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. हा व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नाहीतर तिमाप्पा शेट्टी यांचाच होता. तिमाप्पा यांच्या इडलीनं महिंद्रांनाही भुरळ घातली होती.