स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 20 एप्रिल: महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गज मल्ल या लाल मातीतच घडले. पट्टीतला पैलवान होण्यासाठी व्यायामाबरोबरच त्याला खुराकाचीही मोठी गरज असते. योग्य खुराक मिळाला तर खेळही तितकाच चांगला होतो. पैलवानांचा खुराक थंडाई शिवाय पूर्ण होत नाही. आता हिच महाराष्ट्रीयन थंडाई दुबईतही पोहोचली आहे. सांगलीतील महाबली केसरी मल्ल संग्रामसिंह जाधव यांनी ‘शाही थंडाई’ सुरू केली असून त्याची एक शाखा दुबईत सुरू झाली आहे. पैलवान संग्रामसिंह जाधव यांची शाही थंडाई महाराष्ट्रात कुस्तीची मोठी परंपरा आहे. अनेक पैलवान कुस्ती सोडून पुढे राजकारण किंवा अन्य क्षेत्रांकडे वळतात. सांगलीतील इस्लामपूरचा आंतरराष्ट्रीय मल्ल आणि महाबली केसरी पैलवान संग्रामसिंह जाधव यांनी कुस्ती सोडली तरी क्षेत्र न सोडण्याचा निर्णय घेतला. चांगला मल्ल घडण्यासाठी त्याचा खुराक चांगला लागतो. त्यात थंडाईला अधिक महत्त्व आहे. म्हणून जाधव यांनी दीड वर्षांपूर्वी घरगुती स्वरुपात ‘शाही थंडाई’ तयार करून विकण्यास सुरुवात केली. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचा मोठा विस्तार होत आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये सुरू केला व्यवसाय भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन असताना त्याचा कुस्ती क्षेत्रालाही मोठा फटका बसला होता. सर्वच मल्ल घरात बसून होते. कुस्ती बंद असल्याने घराचा आर्थिक भार वाहण्यासाठी व्यवसायाची गरज होती. म्हणून पै. जाधव यांनी या काळात शाही थंडाईचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला घरगुती स्वरुपात सुरू केलेला व्यवसाय पुढे स्वतंत्र थंडाई विक्री केंद्र सुरू करून वाढवला. आता त्यांच्या महाराष्ट्रात 13 शाखा झाल्या असून एक शाखा दुबईतही सुरू करण्यात आली आहे. दुबईतही शाही थंडाईला मागणी महाराष्ट्रात पैलवानांच्या खुराकाचा भाग असणारी थंडाई आरोग्यासाठी लाभदायी आहे. पैलवान जाधव यांच्या शाही थंडाईची एक शाखा दुबत सुरू करण्यात आली. या थंडाईला दुबईकरांचीही चांगली पसंती मिळत आहे. इस्लामपूरची शाही थंडाई दुबईत मिळत असल्याचे सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाले आहे. महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती आणि थंडाई आता परदेशातही लोकप्रिय ठरत आहे. तर सध्या ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर बुकिंग करूनही थंडाई देणे सुरू आहे. मूर्ती लहान पण… 3 फूट उंचीच्या महिलेनं सुरू केला स्वत:चा व्यवसाय, पाहा प्रेरणादायी Video कशी आहे शाही थंडाई पैलवान खुराक म्हणून दुधासह काजू, बदाम, पिस्ता अन्य ड्रायफ्रूटसह अंडी व मांस खात असतात. त्याचबरोबर दूध व काजू बदाम, पिस्ता या पदार्थांपासून थंडाई तयार केली जाते. दगडी कुंडा आणि लाकडाच दंडा यांच्या सहाय्याने थंडाई बनवली जाते. पैलवान जाधव हे आपल्या घरात थंडाई तयार करून विकत आहेत. इस्लामपुरात थंडाईचा एक ग्लास 25 रुपयांना मिळतो. पैलवानांसोबतच शाही थंडाईला सामान्य लोकांकडूनही मोठी मागणी आहे. थंडाई पिण्याचे फायदे थंडाई पिल्याने शरीरातील थकवा नाहीसा होतो. व्यायाम केल्यानंतर थंडाई पिल्याने शरीर स्वस्थ होते. पचनक्रियेबरोबर पोट साफ होण्यास मदत होते. थंडाईमध्ये ‘ड’ जीवनसत्वाबरोबर प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स बरोबर शरीरास नैसर्गिक ऊर्जा प्राप्त होते. थंडाई ही पैलवान व खेळाडूंसाठी अमृत मानली जाते.