हे फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते. सध्या मोठ्या प्रमाणात या फळाची विक्री बाजारात होत आहे.
हे फळ आधी राजस्थानमधील बिकानेरच्या शहरी भागात आढळत होतं. मात्र, शहर वाढवण्यासाठी केलेल्या वृक्ष तोडणीमुळे शहरातून हे फळ दिसेनासे झाले आहे. त्यामुळे आता हे फळ गाव आणि शहरांलगतच्या भागांमध्ये आढळून येतं.
एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, गूंदी नावाच्या या फळाचा सीजन अवघ्या दोन महिन्यांचा असतो. मे आणि जून या कालावधीत या फळाचा सीजन असतो. या फळाची मागणीही चांगली असते. दुकानदाराने सांगितलं की, गूंदी 180 ते 200 रुपये किलोने विकलं जात आहे. या फळाचा उपयोग भाजीसाठी किंवा लोणचं तयार करण्यासाठीही केला जातो.
लसोडे किंवा गूंदीचे कावानस्पतिक नाम कॉर्डिया मायक्सा आहे. राजस्थान आणि गुजरातसह अन्य राज्यांमध्ये याची झाडं आढळून येतात. या झाडाच्या लाकडाचा जाळण्यासाठीही वापर केला जातो. गूंदीमध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट,वसा,फायबर, आर्यन, फॉस्फरस आणि कॅल्शिअम आहे.
हे फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून सुटका मिळते. या फळामुळे पोट थंड राहण्यास मदत मिळते. सोबतच लिव्हरस रक्तदाब, त्वचा संबंधित आजार आदी परिस्थितीत फायदेशीर ठरते.