मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Tips For Deep Sleep : रात्री लवकर झोप येत नाही? 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Tips For Deep Sleep : रात्री लवकर झोप येत नाही? 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

रात्री नीट झोप मिळाली नाही तर आपल्या आरोग्याचं (Food For deep Sleep) सगळं संतुलन बिघडतं. काय उपाय आहे यावर?

रात्री नीट झोप मिळाली नाही तर आपल्या आरोग्याचं (Food For deep Sleep) सगळं संतुलन बिघडतं. काय उपाय आहे यावर?

रात्री नीट झोप मिळाली नाही तर आपल्या आरोग्याचं (Food For deep Sleep) सगळं संतुलन बिघडतं. काय उपाय आहे यावर?

दिल्ली, 20 सप्टेंबर : अनेकवेळा आपल्याला रात्रीच्या वेळी आपली झोप होत नसल्याने निद्रानाश होतो. अशा वेळी योग्य वेळी आणि भरपूर झोप न मिळाल्याने आपल्या आरोग्याचे (Food For deep Sleep) संतुलन बिघडतं. हल्ली लोकांना आपले आयुष्य धावपळीचे आणि थकवणारे असल्याने ते टेन्शनमध्ये येतात. त्यातून तणाव आणि मग अपूर्ण झोप, रात्रीचं जागरण होत जाते. त्यामुळे आता झोप (Sleep disorder treatment) न होणे ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.

त्यामुळे आता त्यामुळे आपल्याला काही आजारांची लागण (Unhealthy) होण्याची शक्यता असते. वैद्यकीय जाणकारांच्या मते आपल्या शरीराला दररोज 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. जर तुम्हाला सातत्याने रात्रीची झोप येत नसेल तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये बदल करायची गरज आहे. डाइट एक्सपर्ट डॉक्टर रंजना सिंह (Diet Expert Doctor Ranjana Singh) यांच्या मते, व्यक्तीच्या आहारात जर हेल्दी अन्नपदार्थांचा समावेश असेल तर त्याला सुखाची झोप लागू शकते, त्याचबरोबर त्याचे मानसिक संतूलनही चांगले राहते.

गर्भनिरोधक गोळ्या-नसबंदीनंतरही महिला पुन्हा पुन्हा होते प्रेग्नंट; डॉक्टरही शॉक

आपल्या आरोग्यासाठी बदाम हे अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात मॅग्नीशियमचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते. त्याच्या नियमित सेवनामुळे आपल्या मांसपेशींना आराम मिळतो. त्यामुळे आपल्याला रात्रीची आरामदायक झोप घेता येऊ शकते. त्याचबरोबर दुधाच्या सेवनाबाबत डॉक्टर रंजना सिंह म्हणतात की झोपण्याआधी दररोज एक ग्लासभर गरम दुधाचे सेवन करायला हवे. त्यामुळे गाढ झोप येते. आपल्याला अनेकवेळा सकाळच्या जेववनात पनीर खायला मिळते. परंतु तेच पनीर जर आपण रात्री खाल्ले तर त्यामुळे चांगली झोप मिळू शकते. कारण पनीरमध्ये ट्रिप्टोफॅनचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यातून शरीराला आराम मिळतो.

First published:

Tags: Health Tips, Sleep, Sleep benefits