ब्रिटन, 20 सप्टेंबर : किती तरी महिलांना प्रेग्नंट (Pregnant) न होण्याची समस्या आहे. पण यूकेतील (UK) महिला मात्र प्रेग्नंट होत असल्याने वैतागली आहे. सर्व गर्भनिरोधक उपाय (Pregnant even after use contraceptive method) करूनही ही महिला प्रेग्नंट राहत आहे. तिने स्वतः गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या (Pregnant even after taking contraceptive pill) , तिच्या नवऱ्याने नसबंदी केली तरी ती प्रेग्नंट होते आहे (Pregnant even after sterilization) . सर्व खबरदारी घेऊनही ती आता पाच मुलांची आई झाली आहे. ज्यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत.
यूकेतील 39 वर्षांची केट हर्मन (Kate Harman) पुन्हा पुन्हा होणाऱ्या प्रेग्न्सीमुळे हैराण झाली आहे. तिने कितीही प्रतिबंधात्मक उापाय केले तरी ती प्रेग्नंट होते आहे. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर (Birth Control Pills) ती पाच मुलांची आई झाल्यावर आणखी तीन वेळा प्रेग्नंट झाली आहे, असा दावा तिने केला आहे.
हे वाचा - गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, पाहा PHOTOs
झी न्यूजने द मिरर रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार केट म्हणाली, तिचा सर्वात मोठा मुलगा 20 वर्षांचा आहे. तर सर्वात लहान मुलगा 2 वर्षांचा आहे. पहिला मुलगा झाल्यानंतरच ती गर्भनिरोधक गोळ्या घेत होती. तरीसुद्धा ती प्रेग्नंट राहू लागली. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतरही तिला दोन मुलं झाली. त्यापैरी एक आता 14 वर्षांचा आणि एक 8 वर्षांचा आहे.
गर्भनिरोधक घेऊनही केट प्रेग्नंट होत असल्याने शेवटी तिचा नवरा डॅनने नसबंदी करून घेतली. त्यानंतरही ती प्रेग्नंट झाली. जुलै 2015 मध्ये तिच्या नवऱ्याने नसबंदी केली पण प्रेग्नन्सी थांबली नाही, असा दावा तिने केला आहे. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले. जेव्हा केटच्या नवऱ्याचं स्पर्म काऊंट करण्यात आलं तेव्हा नसबंदीनंतर त्याचे स्पर्म 99.9% प्रभावी होते.
हे वाचा - काय म्हणावं याला! लग्नातही डायपर घालून उभा राहिला; महिनाभर टॉयलेटला गेलाच नाही
आता कॅट आपण पुन्हा पुन्हा प्रेग्नंट होतो, या आपलं दुर्दैवी नशीब मानते आहे. आपले सर्व प्रयत्न तिने सोडले आहेत. जे होईल ते पाहू असं ती म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.