मुंबई, 29 नोव्हेंबर : दिवसभर थकल्यानंतर रात्री चांगली झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात उर्जा कायम राहते. परंतु कधीकधी वाईट सवयींमुळे रात्री झोप पूर्ण होत नाही, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी काम करावे असे वाटत नाही. अशा परिस्थितीत काही लोक झोप चांगली लागण्यासाठी औषधे खातात. काहींना तर अशा प्रकारची औषधं घेण्याची सवय लागते आणि त्यामुळे नंतर नैसर्गिक झोप येणं बंदं होतं. अशी औषधं घेऊन झोप आणणे शरीराला हानिकारक आहे. अशा परिस्थितीत झोपायच्या आधी तज्ज्ञांच्या खालील टिप्स पाळून तुम्ही चांगली आणि पुरेशी झोप (good Sleeping) घेऊ शकता.
मोबाईल, गॅजेट बंद करा -
दिवसभर काम केल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण एखादा सिनेमा, वेब सीरीज पाहतात किंवा काहीजण सोशल मीडियावर थोडा वेळ घालवतात. त्यांनंतर झोपण्याचा प्रयत्न करतात, पण अशी पद्धत योग्य नाही. आपल्या गॅझेटमधून निघणारा प्रकाश झोपेच्या संप्रेरकांच्या स्रावामध्ये व्यत्यय आणू शकतो. तज्ञांच्या मते, स्क्रीनपासून दूर राहिल्यानं मेलाटोनिन हार्मोनच्या स्रावाची झोपेसाठी मदत मिळते.
पुस्तक वाचा -
वेब सिरीजऐवजी पुस्तक वाचणे हा एक चांगला पर्याय आहे. वाचन केल्यानं आपलं मन हलकं होतं. झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे आवडते पुस्तक वाचू शकता. पुस्तक वाचत असताना खूप चांगली झोप येते.
झोपायच्या आधी आंघोळ करणे -
हा उपाय सर्वांना दररोज करणे शक्य होईलच असे नाही. पण, काही वेळा तुम्हाला खूप थकवा आला असेल, दिवसभरात तुम्ही खूप कष्ट केले असतील आणि तुम्हाला चांगल्या झोपेची आवश्यकता असल्यास झोपण्यापूर्वी अंघोळ करणे फायदेशीर ठरते. यामुळे खूप चांगली झोप लागू शकते आणि तुमचा थकवा दूर होईल.
हे वाचा - घशात चॉकलेट अडकल्यानं मुलाचा मृत्यू; तुमच्याबाबतीत असं घडलं तर काय कराल?
काहीतरी गरम प्या - हळदीचे दूध किंवा कॅमोमाइल चहा मेंदूसाठी तसेच आतड्यांसाठी फायदेशीर आहे. रात्री काहीतरी गरम पेय घेतल्यानंतरही चांगली झोप लागू शकते.
आपल्या श्वासाकडे लक्ष द्या-
तज्ञ, योग तज्ञ आणि आध्यात्मिक गुरू झोपेच्या आधी श्वासोच्छवासाच्या व्यायामाचे महत्त्व सांगतात. झोपायच्या आधी नाडी सोधनासारखा प्राणायाम केल्याने केवळ मन शांत होत नाही तर चांगली झोप येण्यासही मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sleep, Sleep benefits