मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

घशात चॉकलेट अडकल्यानं गमावला 8 वर्षांच्या मुलानं जीव; तुमच्याबाबतीत असं घडलं तर काय कराल? जाणून घ्या

घशात चॉकलेट अडकल्यानं गमावला 8 वर्षांच्या मुलानं जीव; तुमच्याबाबतीत असं घडलं तर काय कराल? जाणून घ्या

घशात चॉकलेट अडकल्यानं मुलाचा मृत्यू

घशात चॉकलेट अडकल्यानं मुलाचा मृत्यू

चॉकलेट, गोळ्या, च्युईंगम यासारखे पदार्थ चिकट असल्यानं त्या चावून खाणं कठीण असतं. त्यामुळेच असे पदार्थ घशात अडकण्याचा धोका वाढतो

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 नोव्हेंबर :   बालवयात अनेक गोष्टींची उत्सुकता असते. त्या वयात समजही कमी असते. त्यामुळे मुलांकडून अनावधानानं काही चुका होतात, मात्र त्या त्यांच्या जीवावर बेतू शकतात. तेलंगणामध्ये अशी एक घटना घडली. दुसरीत शिकणाऱ्या संदीप सिंह या मुलाच्या घशात चॉकलेट अडकलं. त्यामुळे त्याचा श्वास कोंडला. रुग्णालयात दाखल केल्यावर काहीच वेळात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लहान मुलं चुकून काही गोष्टी तोंडात घालतात. त्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवणं तर गरजेचं आहेच, शिवाय चुकून असं कधी झालंच, तर त्यावेळी काय करायचं, हेही माहीत करून घेतलं पाहिजे.

तेलंगणा जिल्ह्यातल्या वारंगळमध्ये राहणाऱ्या कंघन सिंह यांच्यावर मुलाच्या मृत्यूमुळे आभाळ कोसळलं. मूळ राजस्थानात राहणारे कंघन सिंह 20 वर्षांपूर्वी वारंगळमध्ये राहायला आले. तिथे ते इलेक्ट्रॉनिक्स शोरुम चालवतात. पत्नी आणि चार मुलांसह ते तिथे राहतात. काही दिवसांपूर्वी ते ऑस्ट्रेलियाला गेले होते. तिथून त्यांनी मुलांसाठी चॉकलेट्स आणली होती. दुसरीत शिकणाऱ्या संदीप सिंह या त्यांच्या आठ वर्षांच्या मुलानं त्यातलं चॉकलेट शाळेत नेलं होतं. ते चॉकलेट त्याच्या घशात अडकलं. त्यामुळे त्याचा श्वास कोंडला. त्याला पाहून वर्गातली इतर मुलं घाबरली. वर्ग शिक्षिकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला याबाबत सांगितलं. त्यानंतर संदीपला एमजीएच या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे जाईपर्यंत संदीपची हालचाल बंद झाली होती. हृदयाचे ठोकेही बंद झाले होते. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न करुनही ते संदीपचा जीव वाचवू शकले नाहीत.

हेही वाचा - Yoga Mat Cleaning : योगा मॅटमुळे होऊ शकते इन्फेक्शन, या सोप्या टिप्सने अगदी सहज करा स्वच्छ

घशामध्ये अन्ननलिका व श्वासनलिका अशा दोन नलिका असतात. त्यामुळे काहीही खाताना ते घशात अडकू नये यासाठी चावून खावं असं सांगितलं जातं. चॉकलेट, गोळ्या, च्युईंगम यासारखे पदार्थ चिकट असल्यानं त्या चावून खाणं कठीण असतं. त्यामुळेच असे पदार्थ घशात अडकण्याचा धोका वाढतो. तसं झाल्यास शरीराचा ऑक्सिजन पुरवठा थांबतो व व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अशा गोष्टी घडल्यास काही उपाय करता येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तींच्या घशात काही अडकल्यास जोरजोरात खोकला काढावा. यामुळे तो पदार्थ घशाखाली जाईल. जर श्वास जास्तच कोंडू लागला, तर कोणालातरी खुणावून पाठीवर मारण्यास सांगा. त्यामुळेही अडकलेला पदार्थ खाली जाण्यास मदत होते.

तुमच्यासमोर एखाद्या व्यक्तीच्या घशात काही अडकल्यास त्या व्यक्तीच्या कंबरेवर जोरजोरात मारा. त्यामुळेही आराम पडला नाही, तर त्या व्यक्तीला पुढे झुकण्यास सांगून तोंड खाली करण्यास सांगावं. आपला एक हात त्या व्यक्तीच्या छातीवर ठेवून दुसऱ्या हातानं कंबरेवर जोरजोरात मारावं. यामुळे अडकलेला पदार्थ तोंडातून बाहेर येईल.

हे करूनही उपयोग झाला नाही, तर प्रौढ व्यक्ती असेल तर तिचं पोट जोरजोरात दाबावं. त्यासाठी त्या व्यक्तीच्या मागे उभे राहा. त्या व्यक्तीच्या कंबरेभोवती हात गुंडाळून तिला पुढे झुकण्यास सांगा. बेंबीच्या वर एका हाताची मूठ करून दुसरा हात त्यावर ठेवा. मग त्या व्यक्तीला वर उचला. ही क्रिया 5 वेळा करा. यामुळे पदार्थ बाहेर येण्यास मदत होईल. गरोदर स्त्रिया व एक वर्षाच्या मुलांवर याचा प्रयोग करू नये. असं करूनही घसा मोकळा झाला नाही, तर तातडीनं जवळच्या रुग्णालयात न्यावं.

लहान मुलांच्या घशात काही अडकलं असेल, तर पहिल्यांदा मुलांना तोंड उघडण्यास सांगावं. तो पदार्थ दिसत असेल, तर बोट घालून काढण्याचा प्रयत्न करावा. मात्र दिसत नसेल, तर तसं अजिबात करू नये. त्यामुळे ती वस्तू आणखी आत जाऊ शकते. मुलाला लगेचच रुग्णालयात घेऊन जावं. मुलांच्या घशात अनावधानानं काही पदार्थ अडकू शकतात. त्यावेळी लगेचच प्राथमिक उपाय केले, तर परिस्थिती गंभीर होण्यापासून रोखता येते.

First published:

Tags: Home remedies, Lifestyle