मुंबई, 15 नोव्हेंबर : बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादींमध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वापरला जातो. एवढेच नाही तर लोक कढीपत्त्याचा रसही पितात. पण, आणखी एक गोष्ट आहे, जी तुम्ही या पानापासून बनवू आणि पिऊ शकता आणि ती म्हणजे कढीपत्त्यापासून बनवलेला हेल्दी चहा. होय, कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कढीपत्त्यात अनेक प्रकारचे पोषक तत्व देखील असतात, जे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून बचाव करतात. जाणून घेऊया कढीपत्त्याचा चहा पिण्याचे काय फायदे आहेत आणि तो बनवण्याची पद्धत कशी आहे. कढीपत्त्यातील पोषक घटक - कढीपत्त्यात लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए (कॅरोटीन), व्हिटॅमिन सी इत्यादी अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. त्यामुळे कढीपत्त्याचा चहा पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कढीपत्ता चहाचे फायदे - 1. कढीपत्ता दक्षिण भारतात जास्त वापरला जातो. मात्र, आता बहुतांश लोकांनी त्याचा वापर सुरू केला आहे. कढीपत्त्याचा उपयोग फक्त फोडणी देण्यासाठीच केला जात नाही, तर या औषधी वनस्पतीपासून बनवलेला एक कप चहा देखील आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देतो. 2. Hindustantimes.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया निरोगी राहते. त्यात सौम्य रेचक गुणधर्म आणि पाचक एंजाइम असतात, जे आतड्याची हालचाल सुधारतात. यामुळे पचनक्रियाही सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस, जुलाब आदी समस्याही कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने कमी होतात. 3. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही कढीपत्ता चहाचे सेवन करू शकता. कढीपत्ता चहा रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही, साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. 4. कढीपत्त्यात उच्च पातळीचे फिनॉलिक्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे त्वचेच्या नुकसानापासून संरक्षण करतात. अँटिऑक्सिडंटमध्ये असलेले घटक शरीराला संसर्ग, जळजळ इत्यादीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देखील प्रभावी आहेत. आजारांपासून दूर राहायचे असेल तर एक कप कढीपत्त्याचा चहा नियमित घ्या. हे वाचा - Curry leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा कढीपत्त्याची पाने; याचे फायदे अनेकांना माहीत नसतील 5. तुम्ही गरोदरपणातही या चहाचे सेवन करू शकता. हा चहा प्यायल्याने तुम्हाला उलट्या, मळमळ, मॉर्निंग सिकनेस यासारख्या समस्यांचा त्रास होणार नाही. जर तुम्हाला मोशन सिकनेस असेल तर प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान हा चहा प्या, तुम्हाला उलट्या, मळमळ असा त्रास होणार नाही. 6. कढीपत्त्याचा सुगंध किंवा वास मज्जातंतूंना आराम देण्यास मदत करू शकतो. तणाव दूर करून मन आणि मेंदू शांत होतो. दिवसभर काम करून थकवा जाणवत असेल तर थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी एक कप कढीपत्ता चहा प्या. हे वाचा - Curry Leaves Benefits - वजन कमी करण्यासाठी कधी आणि कशी खावी कढीपत्त्याची पाने ?
कढीपत्ता चहा कसा बनवायचा -
कढीपत्त्याचा चहा बनवण्यासाठी सुमारे 20-25 ताजी कढीपत्ता पाने घ्या. त्यांना पाण्याने स्वच्छ करा. चहाच्या भांड्यात एक कप पाणी घाला आणि गॅसवर ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर गॅस बंद करा. आता त्यात कढीपत्ता टाका. थोडावेळ असेच झाकून ठेवा. गोडवा हवाच असल्यास थोडा गुळ वापरा, साखर नको. काही मिनिटांतच पाण्याचा रंग बदलू लागेल. चहा एका कपमध्ये गाळून घ्या आणि गरमागरम पिण्याचा आनंद घ्या.