जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Curry Leaves Benefits - वजन कमी करण्यासाठी कधी आणि कशी खावी कढीपत्त्याची पाने ?

Curry Leaves Benefits - वजन कमी करण्यासाठी कधी आणि कशी खावी कढीपत्त्याची पाने ?

Curry Leaves Benefits - वजन कमी करण्यासाठी कधी आणि कशी खावी कढीपत्त्याची पाने ?

कढीपत्त्याची पाने आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात (Curry Leaves Are Good For Hair). कढीपत्यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि निकोटीन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे याचे सेवन केल्यास केस आतून बाहेरून निरोगी आणि सुंदर होतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जून : आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असणारे बरेच पदार्थ आपल्या किचनमध्ये असतात. सहज उपलब्ध असलेल्या या गोष्टी आपल्याला बऱ्याचदा मोठे फायदे देऊन जातात. यातीलच एक अतिशय लाभदायी असलेला कढीपत्ता आपल्याला सहज उपलब्ध होतो. याच्या फायद्यांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते त्यामुळे आपण केवळ फोडणी देण्यापुरताच या कढीपत्त्याच्या उपयोग करतो. मात्र आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या काही विशेष गुणांबद्दल माहिती देणार आहोत. वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता कधी व कसा खावा याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. कढीपत्त्याच्या पानांनी असे होईल वजन कमी…. - सकाळी रिकाम्यापोटी पाणी जवळपास सर्वचजण पितात. मात्र तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल (Curry Leaves To Lose Weight) तर दररोज सकाळी रिकाम्यापोटी कढीपत्त्याची पाने (Curry Leaves) चावून खा. कढीपत्यामध्ये अनेक पोषक तत्वअसतात आणि याचा फायदा आपल्या शरीराला मिळतो. सकाळी रिकाम्यापोटी कढीपत्त्याची पाने चावून खाल्याने पोटात जळजळ होणे, ब्लोटिंग, मळमळणे आणि पोटासंबंधित इतर त्रास कमी होतात. हेही वाचा…  Type 2 Diabetes असेल तर या 4 प्रकारची हिरवी पानं चावून खा; कंट्रोलमध्ये राहील मधुमेह - त्याचबरोबर जर तुम्हाला अपचन आणि बद्धकोष्ठतेची (Indigestion) समस्या असेल. तर यासाठी कढीपत्त्याची पाने उपयुक्त ठरतात. कढीपत्त्याची पाने चावून खाल्याने त्याच रस आपल्या शरीरात जातो आणि त्यामुळे आपल्याला अराम मिळतो. त्याचबरोबर कढीपत्ता आपले शरीर डिटॉक्सिफाय करते आणि त्यामुळे वजन कमी (Weight Loss) होण्यास मदत होते. - कढीपत्त्याची पाने तुमच्या शरीरातील ब्लड शुगर (Blood Sugar) आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रित ठेवते. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते आणि तुमचे आरोग्यही उत्तम राहते. यासाठी रोज सकाळी कढीपत्त्याची पाने तुळशीच्या पानांसह चावून खावी. हेही वाचा… World No Tobacco Day 2022: तोंडाचा कॅन्सर होण्यामागचं प्रमुख कारण आलं समोर! एक निर्णय वाचवू शकतो जीव कढीपत्त्याचे इतर फायदे… वजन कमी करण्यासोबतच कढीपत्त्याचे आणखी काही फायदे आहेत. अनेक जणांना सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो किंवा अशक्त असल्यासारखे वाटते. त्यांच्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करणे लाभदायक असते. कढीपत्त्याची पाने चावून खाल्याने मॉर्निंग सिकनेस (Curry Leaves Helps To Reduce Morning Sickness) म्हणजेच सकाळी सकाळी जाणवणारा थकवा, मळमळणे आणि चक्कर येणे या समस्यांपासून अराम मिळतो. कढीपत्त्याची पाने आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात (Curry Leaves Are Good For Hair). कढीपत्यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि निकोटीन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे याचे सेवन केल्यास केस आतून बाहेरून निरोगी आणि सुंदर होतात. सकाळी जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर रिकाम्यापोटी कढीपत्त्याच्या पानाचे सेवन करावे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात