नवी दिल्ली, 26 जानेवारी : कढीपत्ता (Curry leaves) सामान्यतः अन्न चवदार बनवण्यासाठी वापरला जातो. विशेषतः सांबर, इडली, उपमा आणि नारळाची चटणी या दक्षिण भारतीय पदार्थांची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्ण वाटते. त्याचबरोबर उत्तर भारतातही कढीपत्ता वापरण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. मात्र, कढीपत्ता जेवणात चव वाढवण्यासोबतच निरोगी आयुष्याचंही रहस्य आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक आढळतात. हे यकृत आणि पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यासोबतच लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करतात. जाणून घेऊया कढीपत्त्याचे काही (Curry leaves Benefits) अनोखे फायदे.
'मॉर्निंग सिकनेस'पासून मुक्त व्हा
रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचं सेवन केल्यानं तुम्ही मॉर्निंग सिकनेसला 'गुडबाय' म्हणू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि कढीपत्त्याच्या रसात थोडीशी साखर मिसळून या मिश्रणाचं सेवन करा. उलट्या, मळमळ यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे सूत्र खूप प्रभावी ठरू शकतं.
यकृत होईल निरोगी
रोज रिकाम्या पोटी कढीपत्ता चावून खाल्ल्यानं यकृताचं आरोग्य चांगलं राहतं. कढीपत्ता यकृताचं कार्य सुधारण्यासदेखील मदत करतो. एवढंच नाही तर, कढीपत्ता सिरोसिसचा धोका कमी करून यकृत मजबूत आणि निरोगी बनवण्याचं काम करतो.
पचनसंस्था निरोगी राहील
कढीपत्ता पचनक्रिया बळकट करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यानं पोटदुखीच्या समस्येपासून तर सुटका मिळतेच; शिवाय, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. यासाठी तुम्ही दही किंवा ताकासोबत कढीपत्ता खाऊ शकता.
हे वाचा - Health Tips: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे गाजर-आलं सूप; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत
वजन कमी करण्यास उपयुक्त
जर तुम्ही लठ्ठपणानं त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, कढीपत्ता तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. ब्लड शुगर (blood sugar) नियंत्रणात ठेवण्यासोबतच कढीपत्ता कोलेस्ट्रॉलही (Cholesterol) नियंत्रित ठेवतो. यासाठी रोज सकाळी तुळशीच्या पानांसोबत कढीपत्ता घ्या.
हे वाचा - Winter Health: थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा
दृष्टी तेजस्वी होईल
कढीपत्त्यात व्हिटॅमिन 'ए' मुबलक प्रमाणात आढळतं. त्यामुळंच रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. हे केवळ दृष्टी वाढवण्याचं काम करत नाही तर डोळे निरोगी ठेवण्यासही खूप मदत करतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle