मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /work from home tips : वर्क डेस्कवर ठेवा 'ही' झाडं; वाढेल कामाचा उत्साह

work from home tips : वर्क डेस्कवर ठेवा 'ही' झाडं; वाढेल कामाचा उत्साह

आपल्या नेहमीच्या टेबललाच अशा रीतीने सजवलं, तर तुम्ही अधिक ताजेतवाने होऊन, रिफ्रेश होऊन काम करू शकाल.

आपल्या नेहमीच्या टेबललाच अशा रीतीने सजवलं, तर तुम्ही अधिक ताजेतवाने होऊन, रिफ्रेश होऊन काम करू शकाल.

आपल्या नेहमीच्या टेबललाच अशा रीतीने सजवलं, तर तुम्ही अधिक ताजेतवाने होऊन, रिफ्रेश होऊन काम करू शकाल.

    मुंबई, 13 ऑगस्ट : कोरोना  (corona) महामारीच्या काळात गेल्या दीड वर्षापासून अनेक नागरिक घरूनच काम (Work From Home) करत आहेत. घरून काम करणं अनेक दृष्टीने सोयीचं असलं, तरी ऑफिसचा म्हणून एक माहौल असतो, तो मात्र अनेक जण मिस करत आहेत. सहकारी नाहीत, ऑफिसचा डेस्क नाही, कँटीन नाही. ऑफिसच्या वातावरणाची कमतरता (Office Ambience) जाणवत असल्यामुळे अनेकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे.

    अनेकांनी स्टडी टेबलचं रूपांतर ऑफिस डेस्कमध्ये (Office Desk) केलं आहे; मात्र त्यामुळे ऑफिसचं फीलिंग मात्र येत नाही. काही जणांना या कशामुळेच फरक पडत नाही; पण काही जणांना मात्र आजूबाजूच्या वातावरणामुळे बराच फरक पडतो असं वाटतं. म्हणूनच ऑफिसचा माहौल तयार करून कार्यक्षमता वाढणार असेल, तर त्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे? त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे टेबल टॉप प्लांट्सचा (Table Top Plants) वापर.

    20 लाख बक्षीस, 93 गुन्हे दाखल असलेल्या 6 जहाल माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

    आपल्या नेहमीच्या टेबललाच अशा रीतीने सजवलं, तर तुम्ही अधिक ताजेतवाने होऊन, रिफ्रेश होऊन काम करू शकाल. आपण अशा काही झाडांची माहिती घेऊ या, की जी घरात टेबलवर ठेवता येऊ शकतात आणि त्यांचं व्यवस्थापनही (Management) सोपं असेल.

    1. सिंगोनियम (Syngonium): टेबल टॉप प्लांट्समधलं सिंगोनियम हे झाड खूप जणांना आवडतं. ते अनेक शेड्समध्ये उपलब्ध असतं; मात्र गुलाबी आणि हिरव्या शेडच्या रोपांना अधिक मागणी असते. हे झाड तुमच्या डेस्कला सोबर लूक देईल आणि हवा शुद्ध करण्याचं कामही करील. टेबलावर ठेवलेल्या सिंगोनियमच्या झाडाला आठवड्यातून फक्त एक दिवस उन्हात ठेवणं आणि पाणी देणं गरजेचं आहे. त्याची एवढीच काळजी घ्यावी लागते.

    2. गोल्डन पोथोस (Golden Pothos) : हे मनी प्लांटच्या (Money Plant) परिवारातलं झाड असून, त्याचं व्यवस्थापनही अगदी सोपं आहे. हे झाडही हवा शुद्ध करतं आणि ऑक्सिजन हवेत सोडतं. गोल्डन पोथोसलाही खूप जास्त सूर्यप्रकाश आणि पाण्याची गरज भासत नाही. कुंडीतली माती सुकायला लागली, की त्यात थोडं पाणी घालावं लागतं. हे झाडही तुमच्या डेस्कची शोभा वाढवेल.

    3. फिलॉडेंड्रॉन (Philodendron) : या झाडाची सुंदर पानं खूपच आकर्षक असतात. या झाडालाही सौम्य सूर्यप्रकाश आणि कमी पाण्याची गरज असते. त्यामुळे घरातल्या घरात त्याचं व्यवस्थापन सोपं जातं.

    4. सॅन्सेव्हिएरा (Sanseviera) : टेबल टॉप प्लांट्समध्ये हे झाड  देखील अनेकांना आवडतं. या झाडाची पानं सोनेरी आणि हिरव्या रंगाची असतात. हे झाड रात्रीच्या वेळी ऑक्सिजन हवेत सोडतं. त्यामुळे हे झाड वर्क डेस्कवर तर ठेवू शकताच; पण रात्री बेडरूममध्येही ठेवू शकता. या झाडालाही दररोज पाणी घालण्याची गरज नसते.

    5. क्लोरोफायटम (Chlorophytum) : क्लोरोफायटम हे हवा शुद्ध करणारं एक झाड आहे. त्याची पानं गडद हिरव्या रंगाची असतात आणि त्याच्या कडा पांढऱ्या रंगाच्या असतात. या झाडालाही जास्त सूर्यप्रकाश किंवा पाणी लागत नाही. प्रत्येक मोसमात हे शोभा वाढवतं.

    First published: