मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /प्रेग्नन्सीत आवर्जून खाल्ला जाणारा हा पदार्थ लैंगिक समस्यांवरही उपयुक्त; महिलांनी नियमित करावं सेवन

प्रेग्नन्सीत आवर्जून खाल्ला जाणारा हा पदार्थ लैंगिक समस्यांवरही उपयुक्त; महिलांनी नियमित करावं सेवन

एक पदार्थ उत्तम बनवेल तुमची सेक्स लाइफ

एक पदार्थ उत्तम बनवेल तुमची सेक्स लाइफ

तुमच्या किचनमधील हा एक पदार्थ लैंगिक समस्यांवर उपयुक्त असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे.

    मुंबई, 13 ऑगस्ट :  मेथी दाणे (Fenugreek) चवीने कडू असते, त्यामुळे एरवी मेथीचे (Fenugreek seeds) लाडू खायला कुणालाच आवडत नाही. पण प्रेग्नन्सीत (Pregnancy) महिलांना मेथीचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रेग्नन्सीत मेथी महिलांसाठी खूप उपयुक्त असते. पण महिलांनी फक्त प्रेग्नन्सीतच नव्हे तर एरवीसुद्धा मेथीचं सेवन करावं, विशेषत: त्यांना लैंगिक समस्या (Sexual health) असल्यास. कारण मेथी लैंगिक समस्या दूर करण्यात उपयुक्त आहे, असं संशोधनात सिद्ध झालं आहे.

    सेक्स (Sex) ही आरोग्यासाठी (Health) महत्वाची बाब आहे. परंतु, आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत लैंगिक जीवनावर (Sex Life) विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येते.  अशा व्यक्तींनी उपचारांसह जीवनशैली (Life Style) आणि आहार-विहारात योग्य तो बदल करावा असा सल्ला तज्ज्ञ देताना दिसतात. महिलांची लैंगिक समस्या दूर करणारा एक पदार्थ म्हणजे मेथी दाणे.

    नॅचरल सप्लिमेंट्स महिलांमधील लैंगिक समस्यांवर प्रभावी उपाय ठरू शकतात. भारतीय आहार पद्धतीत अशा सप्लिमेंटसचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. सेक्स ड्राईव्ह (Sex Drive) सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा, या अनुषंगाने 30 लोकांवर सहा आठवडे संशोधन करण्यात आले.  किचनमधील मसाल्याचे पदार्थ हे महिलांचा सेक्स ड्राईव्ह सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असं नुकत्याच एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

    हे वाचा - पत्नीचा सेक्समधील Interest वाढवा; मूड चांगला करण्यासाठी वापरा ट्रिक्स

    एका अभ्यासानुसार, रेसिपीत वापरल्या जाणाऱ्या मेथी (Fenugreek) किंवा अन्य बिया या महिलांमधील मेनोपॉजशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. रोज 500 ग्रॅम हर्बल सप्लिमेंटचे सेवन करणाऱ्या महिलांच्या सेक्स लाइफशी संबंधित समस्यांमध्ये 42 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. सेंद्रिय मेथीपासून तयार केलेले लिक्विड हार्मोन्स बॅलन्सिंगसाठी फायदेशीर ठरते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हे लिक्विड पुरुषांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉन आणि महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोन्सला (Hormones) बुस्ट करते. टेस्टेस्टेरॉन हे हार्मोन सेक्शुअल इंटरेस्ट वाढवतं तसंच लैंगिक इच्छा कायम ठेवण्यात भूमिका बजावतं. तसेच यामुळे सेक्सदरम्यान ल्युब्रिकेशन, संवेदना आणि रक्तप्रवाह सुरळीत राहण्यात मदत होते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

    याशिवाय ज्या महिलांना सेक्सदरम्यान वेदना किंवा कोरडेपणाचा त्रास जाणवतो, अशा महिलांनी हर्बल सप्लिमेंटसचे (Herbal Supplement) सेवन केल्यास हा त्रास कमी होतो. भारतातील तज्ज्ञांनी देखील मासिक पाळी येणाऱ्या महिलांना दिवसांतून दोन वेळा सेंद्रिय मेथीपासून बनवलेला अर्क सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. सेंद्रिय मेथी ही नॉर्मल हार्मोनल बॅलन्स ठेवण्याचे काम करते. त्यामुळे सेंद्रिय मेथीचे नियमित सेवन केल्यास सेक्सशी निगडीत समस्या आपोआप कमी होतात, असं संशोधकांच्या पथकाने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

    हे वाचा - नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; उपचार न केल्यास होतात दुष्परिणाम

    हेल्थलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, सेंद्रिय मेथी ही अँटीइन्फ्लेमेटरी असून लिबिडो बुस्टिंगसाठी सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई देशांमध्ये सेंद्रिय मेथीचा वापर दैनंदिन आहारात केला जातो. तसेच मेथीमधील काही औषधी घटक हे शरीरात सेक्स हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करतात. इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन हे त्यापैकीच एक होय. तसेच 80 महिलांवर सुमारे 8 आठवडे करण्यात आलेल्या संशोधनानुसार, रोज 600 मिलीग्रॅम मेथीचा अर्क सेवन केल्यास लैंगिक तृप्ती, लैंगिक फंक्शन्समध्ये आणि एकूणच लैंगिक आरोग्यात सुधारणा होते.

    First published:

    Tags: Lifestyle, Sex, Sexual health, Woman