Home /News /lifestyle /

DOG ही सांगू शकतो तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; अवघ्या काही सेकंदातच करू शकतो निदान

DOG ही सांगू शकतो तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; अवघ्या काही सेकंदातच करू शकतो निदान

अगदी आरटी-पीसीआरच्या जवळपास इतकं कोरोनाचं अचूक निदान डॉगही (Dogs detect coronavirus) करू शकतात.

ब्रिटन, 25 मे : कोरोनाचं निदान (Corona test) लवकरात लवकर होणं हे उपचारांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं जातं, मात्र विश्वासार्ह असलेल्या आरटीपीसीआर टेस्टचे (RT-PCR Test) रिपोर्ट्स हाती यायला किमान दोन दिवस लागतात. अँटीजेन टेस्टचे (Antigen Test) रिपोर्ट तातडीने हाती येतात, मात्र या टेस्टची विश्वासार्हता कमी आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये झालेल्या एका प्रयोगाच्या यशस्वीतेमुळे एक नवा पर्याय खुला होण्याची आशा निर्माण झाली आहे. आता कोणतीही टेस्ट नाही तर चक्क श्वानच कोरोना रुग्ण (Dogs detect corona) ओळखू शकतात. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता किती उत्तम असते, हे आपण जाणतोच. त्यांची ही क्षमता लक्षात घेऊन 'मेडिकल डिटेक्शन डॉग्ज' (Medical Detection Dogs) या संस्थेची 2008 मध्ये स्थापना करण्यात आली. टाइप वन डायबेटीस तसंच अन्य गंभीर विकारांमध्ये किंवा व्यक्तींच्या प्रकृती ढासळण्याच्या थोडा वेळ आधी त्यांच्या घामाच्या वासात (Odour) होणारे बदल टिपण्याच्या दृष्टीने कुत्र्यांना त्या संस्थेद्वारे प्रशिक्षण दिलं जातं. अर्थातच ज्यांनी कुत्रे पाळले आहेत त्यांना प्रकृतीविषयी इशारा मिळण्याच्या उद्देशाने हे केलं जातं. कॅन्सर,पार्किन्सन्स डिसीज आदींच्या निदानाची क्षमता कुत्र्यांमध्ये आहे का, याचंही संशोधन तिथं केलं जातं. जेव्हा कोरोना महासाथ आली तेव्हा नुकतंच या संस्थेने कुत्र्यांकडून मलेरियाचं योग्यनिदान होऊ शकत असल्याबद्दलचं संशोधन केलं होतं. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँडट्रॉपिकल मेडिसीन (LSHTM)या संस्थेसह हे संशोधन करण्यात आलं होतं. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार ताला नावाच्या गोल्डन लॅब्राडोर कुत्र्यासह सहा कुत्र्यांना घेऊन कोविड निदानाबद्दलचं संशोधन करण्यात आलं. कोरोनाबाधित व्यक्तींनी परिधान केलेले कपडे कुत्रे 94 टक्के अचूकतेने ओळखू शकतात, असं या संशोधनात आढळलं. लॅटरलफ्लो टेस्टची अचूकता 58 ते 77 टक्के असून, आरटी-पीसीआर टेस्टची अचूकता 97.2 टक्के आहे. कुत्र्यांची अचूकता पीसीआर टेस्टपेक्षा थोडी कमी असली, तरी कुत्र्यांचा निदानाचा वेग प्रचंड आहे. अक्षरशः काही सेकंदांमध्ये ते निदान करतात. लक्षणं नसणाऱ्या व्यक्ती किंवा संसर्गाचं प्रमाण कमी असलेल्या व्यक्तींचे कपडेही त्यांनी ओळखले. हे वाचा - ...तर रुग्णाला फुलांमुळेही जीवघेण्या आजाराचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध त्यामुळे आतापर्यंत आपल्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियांमुळे गुन्ह्यांच्या तपासकार्यात पोलिसांना मदत करणारे कुत्रे (Sniffer Dogs) नजिकच्या भविष्यकाळात रुग्णांचं निदान करण्यासाठी डॉक्टरांनाही मदत करू शकतील, असं चित्र निर्माण झालं आहे.' 'मेडिकल डिटेक्शन डॉग्ज'च्या सीईओ डॉ. क्लेअर गेस्ट (Dr. Claire Guest) आणि LSHTM चे प्रा. जेम्स लोगान (Pr. James Logan) यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झालं. अद्याप हे संशोधन मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं नसलं तरी त्याचे निष्कर्ष दिलासादायक आहेत. ताला या कुत्र्याचा प्रशिक्षक मार्क सोमरव्हिले याने त्याला प्रशिक्षण दिलं आहे. तीन कमी उंचीच्या स्टँड्सवर व्यक्तींनी परिधान केलेले सॉक्स ठेवण्यात आले. ताला प्रत्येक स्टँडजवळ जाऊन काही सेकंदं हुंगतो आणि त्याला शोधायचा असलेला गंध सापडला, की तो शेपटी हलवून आपल्या प्रशिक्षकाला संकेत देतो. प्रत्येक कुत्र्याची संकेत देण्याची पद्धत वेगळी असते. मिली नावाची कुत्री ठराविक गंध असलेल्या सॉक्स सापडला, की वेगळ्या प्रकारचा आवाज करते. कुत्र्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण द्यायला आठ ते 10 आठवड्यांचा कालावधी लागतो. पॉझिटिव्ह नमुना अचूकपणे ओळखल्यानंतर किंवा निगेटिव्ह नमुन्याकडे अचूकपणे दुर्लक्ष केल्यावर त्यांना आवडीचा खाऊ किंवा अन्य काही तरी बक्षीस स्वरूपात दिलं जातं. कर्मचारी, तसंच नागरिकांचे टी-शर्टस्, सॉक्स, मास्क आदींच्या सहाय्याने कुत्र्यांना निदान करण्यास सांगण्यात येतं. ट्रेनिंगसाठी बराच कालावधी लागतो. तसंच संसर्ग झालेल्या आणि न झालेल्या व्यक्तींचे कपडेही लागतात. घामाच्या वासाच्या सहाय्याने कुत्रे हा फरक ओळखू शकतात. घामातल्या नेमक्या कोणत्या घटकामुळे हेओळखणं शक्य होतं, हे तपासून तशा प्रकारचा कृत्रिम गंध तयार करण्याच्या दृष्टीनेही संशोधन सुरू आहे. त्यामुळे जास्त संख्येने कुत्र्यांना प्रशिक्षण देता येऊ शकेल. हे वाचा - मोठी बातमी : आता पाण्यातही सापडला कोरोना विषाणू, तीन ठिकाणांहून घेतले नमुने कुत्र्यांनी निदान करायला सुरुवात केली, तरी आरटी-पीसीआर टेस्टला पर्याय म्हणून त्यांचा वापर करता येणार नाही. मात्र विमानतळासारख्या ठिकाणी संभाव्य कोरोनाबाधितांना तातडीने ओळखण्यासाठी या प्रशिक्षित कुत्र्यांचा उपयोग होऊ शकेल. त्या संभाव्य व्यक्तींचीच आरटी-पीसीआर चाचणी करता येईल. त्यामुळे सर्वांच्याच चाचण्या करण्याचा आणि सर्वांनाच क्वारंटाइन करण्याचा व्याप वाचू शकेल.
First published:

Tags: Coronavirus, Dog, Health, Test

पुढील बातम्या