Home /News /coronavirus-latest-news /

मोठी बातमी: आता पाण्यातही सापडला कोरोना विषाणू, तीन ठिकाणांहून घेतले होते नमुने

मोठी बातमी: आता पाण्यातही सापडला कोरोना विषाणू, तीन ठिकाणांहून घेतले होते नमुने

शौचालयांमधून निघणाऱ्या सांडपाण्यामध्ये (corona virus found in toilet sewage water) हा विषाणू सापडला असून यासाठी तीन ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला.

    लखनऊ, 25 मे : कोरोना विषाणूमुळं देशात (Corona in India) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी मृतांची आकडेवारी चिंताजनक आहे. अशातच आता कोरोनाविषाणू पाण्यातही सापडल्यामुळं चिंतेत वाढ झाली आहे. शौचालयांमधून निघणाऱ्या सांडपाण्यामध्ये (corona virus found in toilet sewage water) हा विषाणू सापडला असून यासाठी तीन ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यानंतर अनेक ठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने घेण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील पीजीआयने (Lucknow PGI) विविध ठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली. यानंतर सांडपाण्यामध्येही कोरोना विषाणू सापडल्याचं पीजीआय मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉक्टर उज्वला घोषाल यांनी सांगितलं आहे. आता आयसीएमआर-डब्ल्यूएचद्वारे देशातील शौचालयांमधून निघणाऱ्या सांडपाण्याचे नमुने घेण्यास सुरुवात झाली आहे. एसजीपीआय लॅबमध्ये आलेल्या सीवेज सॅम्पलमधील पाण्यात कोरोना विषाणू सापडल्यानंतर ही बाब आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओला कळवण्यात आली आहे. सध्या झालेल्या प्राथमिक अभ्यासानंतर येत्या काळात यावर अधिक विस्तारपूर्वक अभ्यास केला जाईल, असे घोषाल म्हणाल्या. सध्या घेतलेले सांडपाण्याचे नमुने लखनऊमधील खदरा येथील रुकपूर घंटाघर आणि मछली मोहाल येथून घेतले गेले होते. रुग्णाच्या शौचातून पाण्यात पोहोचू शकतो विषाणू डॉ. उज्वला घोषाल म्हणाल्या की काही काळापूर्वी पीजीआयमधील रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा रुग्णाच्या मलात असलेला विषाणू पाण्यात पोहचू शकतो, ही बाब समोर आली. यावरून सर्वच कोरोनाबाधित रुग्णांच्या मलातील विषाणू शौचालयांमधून निघणाऱ्या सांडपाण्यात पोहोचला असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आणखी काही शोधनिबंधांतूनही 50 टक्के रुग्णांच्या मलातून हा विषाणू सांडपाण्यापर्यंत पोहोचला असल्याची बाब समोर आली आहे. हे वाचा - 5 महिन्यांत 7 वेळा इन्फेक्शन, सातवी सर्जरी; ब्लॅक फंगसमुळे भयंकर अवस्था, पण त्याने मानली नाही हार हे वाचा - अरे बापरे! मांजर पाळणाऱ्या चिमुकलीचे अचानक गळू लागले केस; टक्कल करण्याची ओढावली वेळ पाणी संक्रमित होण्याबाबत अभ्यास सुरू डॉ. घोषाल यांनी सांगितलं की सांडपाण्याद्वारे विषाणू नदीच्या पाण्यापर्यंत पोहोचतो अशात ही बाब इतर लोकांसाठी कितपत नुकसानकारक ठरेल यावर सध्या अभ्यास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या