Home /News /lifestyle /

...तर रुग्णाला फुलांमुळेही जीवघेण्या आजाराचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध

...तर रुग्णाला फुलांमुळेही जीवघेण्या आजाराचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध

पत्नीची काळजी घेणाऱ्या पतींसाठी टीप्स

पत्नीची काळजी घेणाऱ्या पतींसाठी टीप्स

रुग्णाला प्रसन्न वाटावं, तो लवकर बरा व्हावा यासाठी त्यांना पुष्पगुच्छ दिला जातो. पण हीच फुलं त्याला गंभीर आजार बळावण्यास कारणीभूत ठरू शकतात.

मुंबई, 25 मे : कोणताही रुग्ण म्हटलं की त्याला बघायला जाताना त्याच्यासाठी आपण फळं किंवा फुलांचा गुच्छ घेऊन जातो. जेणेकरून त्याला प्रसन्न वाटेल आणि तो लवकर बरा होईल. पण रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी आपण जी फुलं देत आहोत, त्यामुळे त्याला जीवघेणा असा आजार होण्याची शक्यता आहे. त्याला फंगल इन्फेक्शन (Flowers cause fungal infection) होऊ शकतं. एकिकडे कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळत असताना दुसरीकडे मात्र म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रुग्णांची संख्या वाढते आहे. म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन (Fungal infection) म्हणजे बुरशीचा संसर्ग (Fungus) आहे. हा आजार जीवघेणाही ठरतो. राज्यात या आजाराचे (Mucormycosis in Maharashtra) आतापर्यंत 2113 रुग्ण सापडले आहेत तर 120 बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता फक्त कोरोनाच नाही तर या आजारापासूनही सावध राहायला हवं. हे वाचा - कोरोना घटला तरी पुणे, नागपूर, मुंबईची चिंता कायम; आता नव्या आजाराचा प्रकोप म्युकरमायकोसिसबाबत नायर रुग्णालयातील प्राध्यापक डॉ. गिरीश राजाध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नायरमध्ये 25 कोविड मुक्त झालेले तर 8 कोविड पॉझिटिव्ह असताना म्युकरमायकोसिस झालेले रुग्ण दाखल आहेत. ब्लॅक फंगस, व्हाइट फंगस आणि यलो फंगसची लक्षणं दिसत आहेत. पांढरी बुरशीची लागण ही म्युकरमायकोसिसपेक्षा अधिक आढळायची, 2 म्युकर तर 50 कॅण्डीडा असं समीकरण असायचं. पण आता परिस्थिती बदलली आहे बुरशीबाबत माहिती देताना राजाध्यक्ष यांनी सांगितलं की, "पिवळी बुरशी ही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये म्हणजे पाल, सापामध्ये आढळणारी आहे. पिवळ्या बुरशीला वैद्यकीय भाषेत एन- होमिनिस म्हणतात. सध्या याचा एकच रुग्ण आहे त्यामुळे याची लागण कशी झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर पांढरी बुरशी म्हणजे कॅण्डीडा.  काळी बुरशी ही मुळात काळ्या रंगाची नसते, तर ती बुरशी लागल्यानंतर तिथली रक्तवाहिनी आणि ती ज्या भागाला रक्त पुरवठा करते ती मरण पावते म्हणून काळा रंग दिसतो, काळी बुरशी ही पांढऱ्या रंगाची असते" हे वाचा - ना कोणती लस, ना औषध! Whisky पिऊन लोकांनी महासाथीशी दिला लढा "कोविड होऊन गेला असेल तर आणि सर्दी झाली तर घरी उपचार करू नका. गाल लाल झाला, दुखू लागला, दात अचानक हलू लागला, डोळ्यात खुपू लागलं, एकच नाक गळू लागलं तर थेट डॉक्टरांकडे जा", असा सल्ला डॉ. राजाध्यक्ष यांनी दिला आहे. "पोटात आणि त्वचेवर होणारी म्युकरची लागण इतकी धोकादायक नाही जितकी नाकात होणारी आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना आम्ही फुलं देऊ नका असं सांगतो, कारण फुलं ही बुरशीची लागण होण्याचा मोठा स्रोत असतो", असंही डॉ. राजाध्यक्ष यांनी सांगितलं.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Coronavirus, Serious diseases

पुढील बातम्या