मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन, कोलेस्ट्रॉल, शुगर कंट्रोलसाठी फायदेशीर ‘ही’ भाजी; मिठाई म्हणूनही खाऊ शकता

वजन, कोलेस्ट्रॉल, शुगर कंट्रोलसाठी फायदेशीर ‘ही’ भाजी; मिठाई म्हणूनही खाऊ शकता

पडवळची भाजी तशी फार कमी लोकांना खायला आवडते. पण, पडवळ चवीबरोबर आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits) आहे.

पडवळची भाजी तशी फार कमी लोकांना खायला आवडते. पण, पडवळ चवीबरोबर आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits) आहे.

पडवळची भाजी तशी फार कमी लोकांना खायला आवडते. पण, पडवळ चवीबरोबर आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits) आहे.

दिल्ली,13 ऑगस्ट : फळं, कडधान्य, भाज्या आरोग्यासाठी अतिशय फायदे आहेत. त्यामुळेच तर, त्यांचा आहारामध्ये समावेश (Included in Diet) असतोच. भाज्या, पालेभाज्या लोक आवडीने खातात. पण, काही भाज्या त्यांच्या चवीमुळे (Test) खाणं टाळलं जातं. कारलं, वांग, शेपू अशा भाज्या पोटासाठी उत्तम असल्या तरी सर्वांनाचं आवडतात असं नाही. त्यातलीच एक भाजी आहे पडवळ (Padval). पडवळ तसं फार कमी लोकांना आवडतं. या भाजीची चव चांगली असूनही घरी आणली जातेच असं नाही. पण, पडवळची भाजी आणि मिठाईसुद्धा करता येते.

पडवळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर (Health Benefits) आहे. याला कोवाक्काई,थोंडाकाई,पोटोल आणि परोरा या नावानेही ओळखलं जातं. आरोग्यासाठी पडवळ खाण्याचे किती फायदे (Health Benefits Of Padval) आहेत हे जाणून घेऊयात. हे फायदे माहिती झाले तर, आहारात ही भाजी समाविष्ट केल्याशिवाय राहू शकणार नाही.

(नको वजनाची चिंता! रोज खा ही हेल्दी खीर; वाढलेली चरबी होईल कमी)

ब्लड शुगर कंट्रोल

पडवळ रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित (Regulating Glucose Levels) करतं. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्याचं सेवन करणं फायदेशीर आहे. पडवळमध्ये अ‍ॅन्टीहायपरग्लेसेमिक गुण आहेत. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत हेते.

पचन सुधारत

पचनक्रिया (Divagation)सुधारण्यासाठी पडवळ खूप मदत करतं. पडवळमध्ये भरपूर फायबर आढळतं शिवाय यात अ‍ॅन्टीअल्सर गुणधर्म देखील आढळतात. पोटातील अल्सर दूर ठेवण्यास मदत करतं. बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्यां कमी होतात.

(स्ट्रेस,वजन कमी करण्यासठी वापरा व्हिटॅमिन डी; पाहा काय सांगतं संशोधन)

कोलेस्टरॉल नियंत्रित करत

कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control) करण्यासाठी पडवळ मदत करत. पडवळमध्ये हायपरलिपिडेमिक गुणधर्म आहेत ज्यामुळे पडवळ कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्याचं काम करतं. LDL म्हणजे खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड म्हणजेच रक्तातील चरबी कमी करण्याचं काम करतं. तसेच HDL म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करत.

(डाळीपेक्षा पाण्यात असतात जास्त प्रोटीन्स; आजारपणात नक्की प्या, Immunity वाढेल)

रक्त शुद्ध करतं

शरीराचं रोगांपासून संरक्ष करण्यासाठी रक्त शुध्दीकरण आवश्यक आहे आणि रक्त शुद्ध करणारे गुण पडवळमध्ये असतात. यामुळे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. ज्यामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो.

(व्यायाम करणाऱ्यांनो करू नका ही चूक! 2 एनर्जी बुस्टर एकत्र घेतल्याने होतं नुकसान)

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी (Weight Loss)करण्यासाठी पडवळ चांगली भूमिका बजावू शकतं. यात कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे वजन कमी करण्यासाठी पडवळ फायदेशीर आहे.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Tasty food, Weight loss