Home /News /lifestyle /

डाळीपेक्षा पाण्यात असतात जास्त प्रोटीन्स; आजारपणात नक्की प्या, Immunity वाढेल

डाळीपेक्षा पाण्यात असतात जास्त प्रोटीन्स; आजारपणात नक्की प्या, Immunity वाढेल

डाळीच्या पाण्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॉस्फरस असतं त्यामुळे अ‍ॅनीमियाचा (Anemia) त्रास कमी होण्याबरोबर वजनही (Weight) कमी होतं

    नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : गेल्या दीड वर्षापासून आपणं कोरोनासारख्या (Corona) महाभयंकर संकटाचा सामना करत आहोत. आता आपल्या सगळ्यांनाच शरीर निरोगी (Healthy Body) ठेवण्यासाठी हलकं आणि हेल्दी अन्न (Light & Healthy Food) खायला हवं हे लक्षात आलेलं आहे.  देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave Of Corona) आल्यानंतर पुन्हा एकदा लोकांनी आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहाराकडे (Diet For Strong Immunity)लक्ष देणं सुरू केलं आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्क घालणं, हँडवॉश किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करणं, सोशल डिस्टन्सिंग या नियमांबरोबर हेल्दी आहारही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण डाळ-भात, किंवा वरण भात तर खोतोचं पण, डाळीच्या पाण्यानेही रोग प्रतिकारशक्ती वाढते. डाळीचं पाणी पिणं आरोग्यासाठी खुप चांगल (Drinking Pulse Water good for Health) आहे. (चहा अतिप्रमाणात उकळू नका; या 7 पद्धतीने तयार करा Healthy Tea) यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीचं पाणी पिऊ शकता. डाळीच्या पाण्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॉस्फरस असतं. त्यामुळे अ‍ॅनीमियाचा (Anemia) त्रास कमी होण्याबरोबर वजनही (Weight) कमी होतं. कोरोना काळात रोज 1 कप डाळ पाणी पिण्याने शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर गेल्याने अनेक आजारांपासून बचाव करतं. पाहूयात डाळ पाणी पिण्याचे फायदे. डाळ पाणी पिण्याचे फायदे डाळ पाणी पिण्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते. तसच शरीरामधून हेवी मेटल्स म्हणजे पारा आणि शिसं यांसारखे जड धातू काढून टाकते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियममध्ये भरपूर प्रमाणात आहे. यात फायबर, व्हिटॅमिन-सी, कार्बोहायड्रेट्य आणि प्रोटिन जास्त प्रमाणात असतात. याचं ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप कमी आहे. (तुम्हालाही वाटतो भाजी चिरणं हा Task? ही पद्धत वापरून वाचवा वेळ, वाढेल पोषण) डाळ पाण्यात थोडं साजूक तूप घातल्याने चवीबरोबर पौष्टिकताही वाढते. डाळीचं पाणी शरीराचं तापमान नियंत्रित करतं. उष्णतेचा त्रास कमी होतो.डाळ पाण्याने शरीरात एनर्जी राहते. महत्वाचं म्हणजे हे पाणी फ्रिजमध्य़े ठेवून पिता येतं. त्याने पौष्टिकता कमी होत नाही. वजन वाढल्याचं टेन्शन असेल तर, वजन कमी करण्यासाठी डाएट म्हणून डाळीचं पाणी पिऊ शकता. (‘हा’ आजार पोखरतो दात आणि हिरड्या; वेळ निघून जाण्याआधी लक्ष द्या) यामुळे कॅलरीज कमी होतात आणि दीर्घकाळ भूकही लागत नाही. अनेक वेळा शरीरातून भरपूर घाम वाहतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. त्यासाठी डाळीचं पाणी प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते. डाळीचं पाणी सहज पचतं. शरीर आणि मेंदूसाठी खुप फायदेशीर आहे. (कितीही रडलं,चिडलं तरी जेवण भरवा!बाळासाठी पोषण महत्त्वाचं; हे आहेत Healthy पर्याय) पचायला हलकं असल्याने शरीरात गॅस तयार होत नाही. पोटाच्या समस्येपासून सुटका होते.लूज मोशन्स किंवा डायरिया झाल्यास, एक वाटी डाळ पाणी प्यायल्याने आराम मिळतो. हे केवळ शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करून लूज मोशन्स कमी करतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Tasty food

    पुढील बातम्या