Home /News /lifestyle /

नको वजनाची चिंता! रोज खा ही हेल्दी खीर; वाढलेली चरबी होईल कमी

नको वजनाची चिंता! रोज खा ही हेल्दी खीर; वाढलेली चरबी होईल कमी

पोटावरची चरबी वाढून शरीर बेढब वाटायला लागलं असेल तर, डायटिंगसाठी पौष्टीक पदार्थ (Healthy Food For Diet) वापरून तयार केली जाणारी खीर खाऊ शकता...

    नवी दिल्ली, 12 ऑगस्ट :  सुंदर आणि सुडौल शरीर (Curvy Body) असावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. त्यासाठी सगळेच जण प्रयत्न करतात. आजकाल बदलेली लाईफस्टाई, खाण्यापिण्याच्या सवयी, अपूरी झोप, रात्रभर जागणं यामुळे आरोग्यावर परिणाम (Effect On Health) होऊन अनेक विकार आणि लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढायला लागली आहे. वाढत्या वजनाची चिंता (Tension Of Weigh Gain) सगळ्यांनाच सतावत असते. तज्ज्ञांच्या मते 70% लोकांच्या चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे लठ्ठ वाढतो आहे. कमी कॅलरीयुक्त आहार घ्यायला सुरूवात केल्यास वजन बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं. दिवसभारात आपणं कॅलरीयुक्त आहार घेतो. त्याऐवजी मखाने खाण्याने पोट भरून वजनही कमी होऊ शकतं. मखाने अतिशय पौष्टीक असतात. त्यामुळे  मखान्याने वजन नियंत्रणात येण्याबरोबर आजारापासून बचाव होऊन आरोग्यालाही फायदा होतो. पाहुयात मखाने खाण्याने शरीराला होणारे फायदे. वजन कमी करण्यासाठी मखान्यामध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळे बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक लागत नाही. पण, अतिप्रमाणात खाऊ नयेत. यात अगदी कमी कॅलरीज असतात. त्यामुळे शरीराला कॅलरी बर्न करावी लागत नाही. यातील प्रोटीन सुद्धा वजन कमी करायला फायदेशीर आहे. त्यामुळे डायटिंग करणाऱ्यांनी नक्कीच वापर करावा. मखाना खाण्याचे इतर फायदेमखानामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असतं. याशिवाय त्यात कॅल्शियम, आयर्न आणि फॉस्फरस असल्याने हेल्दी हाडांसाठी खुप फायदेशीर आहे. मखानामध्ये मॅग्नेशियम असल्याने मसल्‍स कॉन्‍ट्रॅक्‍ट आणि नर्व फंक्‍शन व्यवस्थित ठेवतं. त्यात अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतं, त्यामुळे हृदयरोग, कर्करोग, टाइप -२ डायबेटिजपासून संरक्षण होतं. हे शरीरातील कोणत्याही प्रकारचे इन्फ्लामेशन कमी करतं आणि संधिवातातही फायदा होतो. मखनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मखानामध्ये अ‍ॅन्टीएजिंग गुणधर्म असतात, त्यामुळे नियमित घेतल्यास त्वचेची फ्लेक्सिबिलिटी टिकून राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. माखनाने कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रित होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Diabetes, Health Tips, Lifestyle, Weight loss

    पुढील बातम्या