केळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन आणि पोषक घटक असतात. केळ्यात फायबर असतं शिवाय शरीराला एनर्जी मिळते आणि अनेक आजारांपासून संरक्षण होतं. दुधामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी असतं. हे दोन्हीही पदार्थ आरोग्यदायी असले तरी, सकाळच्या नाश्त्यामध्ये केळं आणि दूध एकत्र घेत असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.