जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / स्ट्रेस, वजन कमी करण्यासठी वापरा व्हिटॅमिन डी; पाहा काय सांगतं संशोधन

स्ट्रेस, वजन कमी करण्यासठी वापरा व्हिटॅमिन डी; पाहा काय सांगतं संशोधन

शरीरामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी झाली की त्यावेळी मसल्स आणि टिश्युज शुगर शरीरात पोहोचवण्याचं काम करायला लागतात. या अतिरिक्त ताणामुळे शरीरात शुगर लेव्हल आणखीन कमी व्हायला लागते.
शरीरातील टीशू तयार करण्यासाठी देखील प्रोटीन आवश्यक आहेत.

शरीरामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी झाली की त्यावेळी मसल्स आणि टिश्युज शुगर शरीरात पोहोचवण्याचं काम करायला लागतात. या अतिरिक्त ताणामुळे शरीरात शुगर लेव्हल आणखीन कमी व्हायला लागते. शरीरातील टीशू तयार करण्यासाठी देखील प्रोटीन आवश्यक आहेत.

‘व्हिटॅमिन डी’लाच (Vitamin D) सनशाइन व्हिटॅमिनही म्हटलं जातं. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली**, 12** ऑगस्ट : निरोगी शरीर आणि रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी**(Vitamin D)**हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. व्हिटॅमिन डी शरीराला सूर्य प्रकाशामधून मिळतं. मात्र कोरोनामुळे **(Corona)**आपण घराबाहेर पडणचं कमी केलं आहे त्यामुळे सूर्यप्रकाशात जाणं होत नाही. परिणामी शरीरात व्हिटॅमिनची (Vitamin D Deficiency)कमतरता निर्णाण होत आहे. व्हिटॅमिन डी शरीरात विरघळणारं जीवनसत्व त्यामुळे इतर घटक शरीरात शोषले जातात आणि हेल्दी राहता येत. व्हिटॅमिन डी स्नायू, दात, हाडांच्या मजबूतीसाठी (Strong Bones)****, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हार्ड फेल्युअर, डायबेटिज आणि कॅन्सर सारख्या आजारांप्रमाणे मानसिक आरोग्यावरही परिणाम(Effects On Mental Health) करतो. सुर्यप्रकाशात गेल्यानंतर आपलं शरीर स्वत:चं व्हिटॅमिन डी तयार करतं. व्हिटॅमिन डी शरीराप्रमाणे मानसिक आरोग्यावर किती परिणाम करतं हे जाणून घेऊयात. ( चहा अतिप्रमाणात उकळू नका; या 7 पद्धतीने तयार करा Healthy Tea ) आजार दूर राहतात शरीरात व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात तयार होत असेल तर आपलं शरीर स्वतःला अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांपासून वाचवू शकतं. यासंदर्भात  2008 मध्ये एक संशोधन करण्यात आलं. त्यात असं आढळून आलं की व्हिटॅमिन डीमुळे हृदयाशी संबंधित आजारांची शक्यता कमी होते. तर, 2010 मध्ये झालेल्या संशोधनानुसार सर्दी-खोकला, फ्लू होण्यापासून बचावासाठी हे व्हिटॅमिन जरुरी आहे हे देखील स्पष्ट झालय. ( सावधान!कोरोनाच्या आडून हा आजार कधी वाढला कळालंच नाही; 5 राज्यांमध्ये जास्त रुग्ण ) डिप्रेशन कंट्रोल संशोधनानुसार असं आढळून आलं आहे की, व्हिटॅमिन डी आपल्या मूडवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतं. यासाठी डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांना व्हिटॅमिन डी गोळ्या दिल्यानंतर त्यांच्यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आल्याचं शांस्त्रज्ञांना दिसून आलं. आणखीन एका संशोधनात व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांमध्ये तणाव आणि भीतीसारख्या समस्या जास्त दिसून आल्या. ( दिसताच गळ्यावर सूज करून घ्या टेस्ट; कॅन्सर, थायरॉईडचं असू शकतं लक्षण ) वजन कमी करण्यासाठी वापरा वजन कमी करायण्यासाठी व्हिटॅमिन डी सप्लीमेंट घेता येतात. संशोधनानुसार दररोज कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी घेणाऱ्यांना वजन कमी करणं सोपं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात