मुंबई, 19 मार्च : नेहमी इतरांच्या सुखाची काळजी घेणार्यांपैकी तुम्ही असाल आणि त्यांची काळजी घेत असाल तर तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. जे लोक नेहमी इतरांची काळजी घेतात, ते नेहमी स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या भावनांना अधिक महत्त्व देतात. ते इतरांच्या समस्या सोडवताना स्वतःचे जीवन गुंतागुंतीचे करतात. इतरांची काळजी घेणे ही चांगली गोष्ट असली, तरी जेव्हा तुम्ही स्वतःपेक्षा जास्त इतरांना प्राधान्य देऊ लागता तेव्हा समस्या वाढू लागतात. ज्यांना तुमची गरजही नाही त्यांची तुम्ही काळजी करता. काही काळानंतर तुम्हाला मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या अस्वस्थ वाटू शकते. अशा परिस्थितीत ही सवय सोडून द्यावी.
जास्त काळजी घेणे हानिकारक का आहे?
- स्टाइलक्रेझनुसार यामुळे मेंदूला थकवा जाणवू शकतो.
- इतरांचा अतिरेकी विचार केल्याने तुम्ही शारीरिकदृष्ट्या आजारी होऊ शकता.
- यामुळे तुम्ही स्वतःला वेगवेगळ्या प्रकारे हानी पोहोचवू शकता.
- तुम्ही नैराश्यदेखील येऊ शकते.
या वयात पालकांनी मुलांसोबत झोपणं थांबवावं! एक्सपर्ट्सनी सांगितली कारणं
आपण इतरांची जास्त काळजी करत आहात हे कसे ओळखावे?
- प्रत्येकाच्या बाबतीत तुमची वागणूक लवचिक असते.
- तुम्हाला इतरांना कोणत्याच गोष्टीसाठी नकार देता येत नाही.
- प्रत्येक परिस्थितीत मदत मिळण्याची आशा असते.
- तुमची चूक नसतानाही तुम्ही माफी मागता.
अधिक काळजी घेणे कसे थांबवायचे?
- स्वतःसाठी वेळ काढा.
- स्वतःच्या नजरेत तुमचे महत्त्व ओळखा.
- तुमची ऊर्जा हुशारीने वापरा.
- इतरांची पर्वा न करता स्वतःसाठी मनसोक्त जगा.
- आजच्या काळात जगा आणि भविष्याचा विचार करा.
- ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
इतरांची काळजी घेणे, आदर करणे आणि प्रेम करणे हे चांगलेच आहे, परंतु जेव्हा या सर्व गोष्टींचा अतिरेक होतो, तेव्हा ते त्वरित थांबवण्याची गरज असते. असे न केल्यास तुमचा स्वाभिमान कमी होईल आणि इतरांच्या नजरेत तुमची किंमत राहणार नाही. स्वतःला समजून घ्या, स्वतःची काळजी घ्या, तरच लोक तुमची काळजी घेतील.
Relationship Tips: पार्टनर करतोय प्रेमात फसवणूक; या लक्षणांवरुन मिळतील संकेत
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Mental health