नवी दिल्ली, 26 जुलै : पती-पत्नी किंवा प्रियकर -प्रेयसीच्या नात्यात (Relationship) परस्पर विश्वास महत्त्वाचा असतो. विश्वासामुळे नातं अधिक घट्ट होतं. परंतु, अलीकडच्या काळात नात्यात वादविवाद वाढण्यामागं एक सर्वसामान्य कारण पाहायला मिळतं. रिलेशनशिपमध्ये जोडीदार आपली फसवणूक (Cheating) तर करत नाहीये ना, असा प्रश्न अनेकांना नेहमीच सतावतो. जोडीदाराच्या (Partner) वर्तवणुकीत काही बदल दिसू लागला तर हा संशय अधिकच वाढतो. यातून नात्यात वादविवाद वाढतात. यातून नातं तुटण्याची चिंता सतावते. परंतु, जोडीदार आपल्याला धोका देतोय की नाही, हे पडताळून पाहण्यासाठी काही सोप्या गोष्टींकडे बारकाईनं लक्ष देणं आवश्यक आहे. `अमर उजाला`ने या विषयीची माहिती दिली आहे.
रिलेशनशिपमध्ये विश्वास, प्रेम आणि आपुलकी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. या गोष्टींमुळे नातं अधिक घट्ट होतं. पण काही गोष्टींमुळे नात्यात वाद निर्माण होतात. जोडीदार आपल्याला धोका तर देत नाही, फसवणूक तर करत नाही ना, हा संशय त्यात प्रमुख असतो. मात्र काही गोष्टींच्याआधारे तुम्ही ही गोष्ट पडताळून पाहू शकता. रिलेशनशीपमध्ये असूनही, जेव्हा तुम्हाला एकटेपणा (Loneliness) जाणवू लागतो, तेव्हा जोडीदाराचा या नात्यातला रस कमी झाला आहे, असं समजावं. अशा स्थितीत जोडप्यांमधली भावनिक ओढ कमी होऊ लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी प्राथमिकता नसता. त्यावरून त्याला तुमच्यासोबत राहायचं नाही, असं समजून घ्यावं.
रिलेशनशीपमध्ये कपल्स एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर करतात. भलेही रोज कपल्स एकमेकांना भेटू शकत नसतील आणि बोलायला वेळ मिळत नसेल, मात्र जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची गोष्ट एकमेकांसोबत शेअर करतात. पण जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यापासून काही गोष्टी लपवू लागतो किंवा खोटं बोलू लागतो, तेव्हा तो या नात्यावर खूश नाही किंवा तो तुमची फसवणूक करतोय, असं समजायला हरकत नाही.
बदल (Change) हा गरजेचा असतो. नात्याच्या सुरुवातीला जोडीदार तुमच्याशी ज्या पद्धतीनं वागतो, ही वागणूक फार काळ कायम राहते असं नाही. काही वर्षानंतर जोडीदाराच्या वागणूकीत थोडाफार बदल होतो. पण हा बदल खूप नकारात्मक (Negative) जाणवू लागला तर तुम्ही जोडीदारापासून सावध राहणं आवश्यक आहे. जोडीदार ज्या गोष्टींवर आधी खूश असायचा, मात्र, आता त्यावर नाराज होत असेल तसंच तुमच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करू लागला असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर राहावं.
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये असता, त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असता, अशावेळी तुम्हाला त्या व्यक्तीसोबत जास्तीतजास्त वेळ घालवावा, असं वाटतं. जेव्हा तुम्ही जोडीदाराला भेटण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी आतुर असता, अशा वेळी तुमच्या जोडीदाराकडं तुमच्यासाठी वेळ नसेल तर तो तुमची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामामुळे वेळ न देणं ही बाब रास्त आहे. पण भेटायला किंवा बोलायला वारंवार नकार देणं, बहाणे बनवणं या गोष्टी सातत्याने होत असतील तर त्याने हा वेळ तुमच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला दिला आहे, असं समजावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Relationship